TRENDING:

क्रेटाने उद्ध्वस्त केलं 14 वर्षीय मुलाचं आयुष्य; गमावले दोन्ही पाय, दोघांचा मृत्यू; Accident Video

Last Updated:

भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि कार थेट हॉटेलमध्ये घुसली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लातूर : आपल्याकडे कार असावी असं स्वप्न अनेकांचं असतं. पण हीच काळ काही जणांसाठी जीवघेणी ठरली आहे. अशीच धक्कादायक घटना घडली आहे ती लातूरमध्ये. क्रेटा कारमुळे एका 14 वर्षीय मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, त्याने आपले दोन पाय गमावले आहेत. तर या कारच्या अपघातात दोन जणांनी आपला जीव गमावला आहे.
लातूर अपघात
लातूर अपघात
advertisement

औसा इथं हा भीषण अपघात झाला आहे. हायवे क्रमांक 361 वर सीएनजी पेट्रोल पंपाच्या जवळ असलेल्या एका हॉटेलात भरधाव कार घुसली आहे. हैदराबादहून लातूरकडे जाणारी ही क्रेटा कार. भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि कार थेट हॉटेलमध्ये घुसली.

दैव बलवत्तर म्हणून...! संपूर्ण बाईक पेटून खाक, बाईकचालकाला काहीच झालं नाही; थरारक VIDEO

advertisement

या अपघातात हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 14 वर्षीय मुलाचे दोन्ही पाय तुटले आहेत. ओमकार कांबळे असं या मुलाचं नाव आहे. तर कारमधील 2 जण जागीच ठार झालेत. तसंच कार मधील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. गाडीचा चक्काचूर झाला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
क्रेटाने उद्ध्वस्त केलं 14 वर्षीय मुलाचं आयुष्य; गमावले दोन्ही पाय, दोघांचा मृत्यू; Accident Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल