शिक्षकांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय रोहन उत्तम कांबळे हा विद्यार्थी आपल्या बहिणीची शाळा सोडल्याचा दाखला (TC) घेण्यासाठी विद्यालयात गेला होता. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जाधव आणि इतर शिक्षकांनी त्याला बेदम मारहाण केली. रोहनची बहीण साक्षी कांबळे हिने या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला असता, शिक्षकांनी तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतल्याचेही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे.
advertisement
ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा
या गंभीर प्रकारानंतर पीडित रोहन कांबळे याने अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी मुख्याध्यापक जाधव यांच्यासह अन्य तीन शिक्षकांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांसह जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांवर शिक्षकांकडूनच अशा प्रकारे मारहाण होणे ही गंभीर बाब असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, गुरूपोर्णिमेदिवशी असा प्रकार समोर आल्यानंतर आता लातूरमध्ये खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. शाळेचे मुख्याध्यापक जाधव आणि इतर शिक्षकांनी त्याला बेदम मारहाण केल्याने आता अनेकांनी टीका केली आहे.