रॅगिंग किंवा घातपाताचा संशय?
पालकांनी व्यक्त केलेल्या संशयाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विशेष तपास पथक (SIT) नेमलं आहे. नांदेड येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सहा सदस्यीय समिती आता या प्रकरणाचा सखोल तपास करणार आहे. लातूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत अर्चना पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली. जरी प्राथमिक तपासात आणि शवविच्छेदन अहवालात काही गोष्टी स्पष्ट झाल्या असल्या, तरी पालकांनी उपस्थित केलेले शंकाकुशंक आणि समाजात असलेला असंतोष पाहता, प्रत्येक बाजूने चौकशी केली जाणार आहे. यामध्ये रॅगिंग किंवा घातपाताचा कोणताही कोन दुर्लक्षित केला जाणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
advertisement
आकस्मिक मृत्यूची नोंद
मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्काच्या मृत्यूनंतर परिसरात तीव्र पडसाद उमटले होते. पोलिसांनी यापूर्वीच आकस्मिक मृत्यूची नोंद करून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी ६ जानेवारी रोजी विद्यालयातील कर्मचारी पल्लवी सचिन कणसे आणि लता दगडू गायकवाड यांना अटक केली आहे. आता एसआयटीच्या माध्यमातून या प्रकरणातील नेमके वास्तव लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विद्यार्थी काँग्रेसने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. केवळ आत्महत्येचा ठपका ठेवून हे प्रकरण बंद करणे अन्यायकारक असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. शाळेतील मानसिक ताण, शैक्षणिक दबाव आणि समुपदेशनाचा अभाव यामुळेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप विद्यार्थी काँग्रेसने केलाय.
