TRENDING:

Latur News : 60 हजारांसाठी 22 वर्षीय तरुणाचा गेला जीव; लातुरात लॉज कामगारास जीवंत जाळलं

Last Updated:

Latur News : लातूर शहरातल्या औसा रोडवरील एका लॉजवर काम करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाला निर्जनस्थळी नेऊन जीवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या खून प्रकारणी अहमदपुर तालुक्यातल्या एका तरुणासह तिघा विरोधात विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सचिन राजू लामतुरे असे मयत तरुणाचे नाव आहे, सचिन मूळ निलंगा तालुक्यातल्या निटूर या गावचा रहिवासी आहे. सचिन राजू लामतुरे हा लातुरात एका लॉजवर कामाला होता. पैसे देण्या घेण्याच्या कारणावरुन हा खून झाल्याचे प्राथमिक स्वरुपात सांगण्यात येतंय. मयत सचिन लामतुरे यांच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन विवेकानंद पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

advertisement

आरोपी अद्याप फरार आहेत. मात्र विवेकानंद पोलिसांनी एफआईआर वर फक्त एकाच आरोपीचे नाव गुह्यात नोंद केलं आहे. दिगंबर साबणे असे एकमेव आरोपीच्या नावाचा उल्लेख केला असून इतर दोन आरोपीच्या नावाचे गूढ कायम ठेवलंय. या खून प्रकरणात एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं नाव असल्याने पोलिसांनी इतर दोन आरोपींच्या नावाचा सस्पेंस कायम ठेवत मीडियाला बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी उलट सुलट चर्चेचा उधान आलं आहे.

advertisement

वाचा - रूममेट घरी गेलेल्या अन् ती खोलीत एकटीच; तरुणी अशा अवस्थेत आढळली की जळगाव हादरलं

कसा लागला हत्येचा तपास?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

दिगंबर साबणे याच्यासह अन्य दोघांनी सचिनला लॉजवर डे-नाईट ड्युटी करण्यासंदर्भात तगादा लावला. सचिनने त्यास नकार दिला. त्यावरून डे-नाईट ड्युटी कर, नाही तर उचल घेतलेले पैसे परत कर, या कारणावरून छत्रपती चौक ते कव्हा तलावाकडे जाणार्‍या रस्त्यावर त्याचा खून करून मृतदेह अर्धवट जाळल्याच्या स्थितीत आढळून आला. पोलिसांसमोर अनोळखी मृतदेह म्हणून ओळख पटविण्याचे आव्हान होते. परंतु शेवटचा कॉल रेकॉर्ड तपासले असता पूर्ण खूनाचा उलगडा झाला. याबाबत राजू बाबुराव लामतुरे यांच्या तक्रारीवरून दिगंबर साबणे याच्यासह अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/लातूर/
Latur News : 60 हजारांसाठी 22 वर्षीय तरुणाचा गेला जीव; लातुरात लॉज कामगारास जीवंत जाळलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल