रूममेट घरी गेलेल्या अन् ती खोलीत एकटीच होती; नर्सिंगची विद्यार्थिनी अशा अवस्थेत आढळली की जळगाव हादरलं
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
करुणा हिचा चार महिन्यांपूर्वीच सुरत येथील होमगार्ड तरुणासोबत साखरपुडा झाला होता. मात्र, लग्नाआधीच तिने अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली
जळगाव (नितीन नांदुरकर, प्रतिनिधी) : जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात शासकीय परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या (नर्सिंग) प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. करुणा संतोष बोदडे हिने राहत्या खोलीमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. मैत्रिणी गावाकडे गेलेल्या असल्याने ती खोलीत एकटीच होती. याचवेळी करुणाने हा टोकाचा निर्णय घेतला. ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
करुणा अन्य तीन मैत्रिणींसह दीक्षितवाडीमधील वानखेडे इमारतीमध्ये भाडे तत्वावरील खोलीत राहत होती. यामधील तीन विद्यार्थिनी सुट्टी असल्याने गावाकडे गेल्या होत्या. अशात खोलीवर एकटीच असलेल्या करुणाने रविवारी संध्याकाळी गळफास घेत जीवन संपवलं. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
करुणा हिचा चार महिन्यांपूर्वीच सुरत येथील होमगार्ड तरुणासोबत साखरपुडा झाला होता. मात्र, लग्नाआधीच तिने अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला असून एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
advertisement
तरुणीची मित्रांनीच केली हत्या
पुण्यातूनही नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा खून करून तिचा मृतदेह जाळल्यानंतर पुरण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलीय. भाग्यश्री सुडे या तरुणीचं तिच्याच मित्रांनी अपहरण केलं. त्यानंतर तरुणीच्या घरच्यांकडे खंडणी मागितली. त्यानंतर आपण पकडले जाऊ या भितीने तरुणीचा खून केला. याप्रकरणी शिवम फुलवाळे, सागर जाधव आणि सुरेश इंदूरे या तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 08, 2024 2:04 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
रूममेट घरी गेलेल्या अन् ती खोलीत एकटीच होती; नर्सिंगची विद्यार्थिनी अशा अवस्थेत आढळली की जळगाव हादरलं









