पिंपरी : राज्यात २९ महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. पण, अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर वेगवेगळे वाद पाहण्यास मिळत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी मतदान सुरू असताना एका मतदान केंद्रावर वेगळाच प्रकार घडला आहे. घड्याळ चिन्हासमोर बटण दाबल्यावर लाईट लागत नाही, पण कमळाच्या चिन्हासमोर बटणाचं लाईट लागत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदान थांबवण्यात आलं.
advertisement
पिंपरी चिंचवडमधील भोसरीत हा प्रकार घडला आहे. भोसरीत प्रभाग क्रमांक ६ मध्ये सदगुरूनगर येथील एस एन जी इंग्लिश स्कुलमध्ये मतदान सुरू आहे. यावेळी ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप स्थानिक मतदारांनी केला आहे.
मतदार जेव्हा घड्याळाच्या चिन्हावरील बटन दाबलं तेव्हा लाईट लागला नाही. पण कमळ चिन्हासमोर बटणावर बोट ठेवताच लाईट लागून कमळाला मत जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मतदारांनी हा प्रकार लक्षात आणून दिला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर मतदान केंद्रावर एकच गोंधळ पाहण्यास मिळाला. त्यामुळे या मतदान केंद्रावर काही काळ पोलीस प्रशासन, निवडणूक निर्णय अधिकारी आणि स्थानिक मतदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. त्यामुळे काहीकाळ मतदान यंत्रणा थांबली होती.
तर असाच प्रकार पुण्यातही घडला आहे. पुण्यातील सदाशिव पेठ भागातील प्रभाग क्रमांक 25 ड शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये मतदान सुरू आहे. यावेळी इथं वेगळाच प्रकार घडला. राष्ट्रवादीचे बटन दाबल्यानंतर मतदान होत नसल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. उमेदवाराने आक्षेप घेतल्यानंतर मतदान केंद्रावर एक गोंधळ उडाला. त्यामुळे मतदान केंद्रावर मतदान केल्यावर 360 मतदान राखीव ठेवल्याचा निवडणूक निर्णय अधिकार्यांनी घेतलाा आहे. राष्ट्रवादीचे बटन दाबल्यानंतर भाजपाला मतदान होत असल्याचा आरोप मतदारांनी केलाा आहे.
