TRENDING:

Local Body Election 2025 : पालघरच्या राजकारणात मोठा भूकंप, शिंदे गटाने डाव टाकला, मित्रपक्षाची डोकेदुखी वाढणार

Last Updated:

Local Body Election 2025 : डहाणू नगरपरिषद निवडणुकीत राजू माच्छी आणि सहा नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश भाजपसह सर्व पक्षांसाठी मोठा धक्का ठरला असून राजकीय समीकरणे बदलली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राहुल पाटील, प्रतिनिधी पालघर: स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्षाने कंबर कसली आहे. भाजप एकीकडे स्वबळाचा नारा देण्याचा बाता करत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूनी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीचं सूत्र मजबूत होतात का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आता पालघरची समीकरण बिघडणार की घडणार याकडे लक्ष लागलं आहे. पालघरकडे राजकीय पक्षांचा जास्त फोकस नसला तरी स्थानिक पातळीवर मात्र घडामोडी घडत आहेत. त्याचा थेट फटका निवडणुकीत बसू शकतो.
News18
News18
advertisement

पालघर जिल्ह्याच्या डहाणू विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाने आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर एक मोठा राजकीय डाव टाकला. डहाणू नगरपरिषद हद्दीतील एक वजनदार नेते आणि माजी उपनगराध्यक्ष राजू माच्छी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे डहाणूच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून, विरोधी पक्षांसह मित्रपक्ष असलेल्या भाजपलाही मोठा धक्का बसला.

advertisement

माजी उपनगराध्यक्षांसह ६ नगरसेवकांचा प्रवेश

डहाणू नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष असलेल्या राजू माच्छी यांनी आपल्यासोबत तब्बल सहा माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. स्थानिक राजकारणावर मजबूत पकड असलेल्या या नेत्यांचा प्रवेश हा केवळ आकड्यांचा नाही, तर डहाणू शहरातील राजकीय समीकरणे बदलणारा मानला जात आहे. हा पक्षप्रवेश केवळ शिवसेनाउद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेससाठीच नाही, तर शिंदे गटाचा मित्रपक्ष असलेल्या भाजपसाठीही मोठी डोकेदुखी ठरू शकतो.

advertisement

नेमकं काय कारण?

यामागचे कारण स्पष्ट आहे: डहाणू नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत हेच दावेदार मानले जात आहेत आणि त्यांनी या जागेवर आपला दावा मजबूत केला आहे. अशा परिस्थितीत, नगरपरिषदेतील वजनदार नेते राजू माच्छी यांचा शिंदे गटातील प्रवेश भाजपच्या जिल्हाध्यक्षांना मोठे राजकीय आव्हान निर्माण करणारा ठरला आहे.

मित्रपक्षाची डोकेदुखी वाढणार

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एकाच ठिकाणी दिवाळीचं सर्व सामान, 2 रुपयांपासून करा खरेदी, हे आहे लोकेशन
सर्व पहा

राजू माच्छी आणि त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे डहाणू नगरपरिषदेत आता शिवसेना शिंदे गट मजबूत स्थितीत आली आहे. त्यामुळे, आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गट मित्रपक्षांना सोबत न घेता स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याच्या जोरदार चर्चा सध्या डहाणूच्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. माच्छी यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद केवळ वाढली नाही, तर त्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची क्षमताही सिद्ध केली आहे. राजू माच्छी यांच्या राजकीय अनुभवाचा आणि स्थानिक जनसंपर्काचा फायदा घेत शिंदे गट डहाणू नगरपरिषदेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न पाहत आहे. एकूणच, या पक्षप्रवेशाने डहाणूचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले असून, नगरपरिषद निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळेल, यात शंका नाही.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Local Body Election 2025 : पालघरच्या राजकारणात मोठा भूकंप, शिंदे गटाने डाव टाकला, मित्रपक्षाची डोकेदुखी वाढणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल