Diwali Shopping : एकाच ठिकाणी दिवाळीचं सर्व सामान, 2 रुपयांपासून करा खरेदी, हे आहे लोकेशन
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
दिवाळीला आता अगदी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. या सणासाठी अनेक गोष्टींची खरेदी करावी लागते.
पुणे : दिवाळीला आता अगदी मोजकेच दिवस शिल्लक आहेत. या सणासाठी अनेक गोष्टींची खरेदी करावी लागते. पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डी मार्केटमध्ये तुम्ही अगदी दोन रुपयांपासून दिवाळीची खरेदी एका छताखाली करू शकता. जर तुम्ही अजूनही दिवाळीची खरेदी केली नसेल, तर येथे तुम्हाला दीपावलीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळतील.
दिवाळीनिमित्त पिंपरी चिंचवड येथील आकुर्डी येथे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व वस्तू भेटणार आहेत आणि या ठिकाणच्या वस्तूंवर तुम्हाला 40 ते 50 टक्के डिस्काउंट देण्यात आले आहे. फटाक्यांपासून ते घर सजावटीपर्यंत सर्व वस्तू तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.
advertisement
आकुर्डी मार्केटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे दिवे, झुंबर, लक्ष्मीची पावले, वेगवेगळ्या लाईटिंग डिझाईन्सचे दिवे, फटाके आणि रंगीबेरंगी सजावटीच्या वस्तू मिळतात. प्रत्येक दुकानामध्ये वस्तू सुलभ किमतीत आणि विविध डिझाइनमध्ये उपलब्ध आहेत. येथे तुम्ही थेट बंपर ऑफर्स आणि खास डील्स देखील पाहू शकता, जे दिवाळीसाठी खास ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसोबत वेळेची आणि पैशाची देखील बचत होणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 16, 2025 10:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali Shopping : एकाच ठिकाणी दिवाळीचं सर्व सामान, 2 रुपयांपासून करा खरेदी, हे आहे लोकेशन