Gold Rate In Diwali : दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करताय? काय असणार भाव? बाजारातून मोठी अपडेट समोर
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक नागरिक धनत्रयोदशीचा आणि पाडव्याच्या दिवशी सोने खरेदी करतात. मात्र मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भभिडले आहेत.
पुणे: दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना बाजारपेठेत सणाची लगबग सुरू झाली आहे. कपडे, मिठाई, सजावटीच्या वस्तू, दिवे यांसह सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये देखील ग्राहकांची वर्दळ दिसत आहे. मात्र यंदा सोन्याचे दर अक्षरशः गगनाला भिडल्याने सामान्य ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. याबाबतची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना व्यावसायिक फत्तेचंद रांका यांनी दिली.
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून सध्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,30,000 घरात पोहोचला आहे. यामुळे धनत्रयोदशी’ आणि लक्ष्मीपूजन निमित्त सोनं खरेदी करण्याचा पारंपरिक संकल्प अनेकांना जड जात आहे.
पुण्यातील प्रमुख फत्तेचंद रांका यांनी सांगितले की, सोनेखरेदीचा उच्चांक हा मागच्या वर्षीपेक्षा जास्त असू शकतो, दिवाळी हा सोन्याच्या खरेदीचा हंगाम असतोच, पण यंदा भाव जास्त असल्यामुळे ग्राहक लहान दागिने, हलकी चेन, अंगठ्या किंवा नाणी यांच्याकडे अधिक वळले आहेत.
advertisement
अनेक नागरिकांनी पारंपरिक सोनं खरेदी करण्याऐवजी सोने ETF किंवा डिजिटल गोल्डकडे वळण्यास सुरुवात केली आहे. जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन, जागतिक स्तरावर असलेले युद्धाचे सावट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टारिफचे धोरण आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल या तिन्ही घटकांमुळे दरात तीव्र वाढ झाली आहे.
दरवाढ असूनही भावनिकदृष्ट्या सोनं घेणं शुभ ही भावना कायम असल्याने दुकानांत काही प्रमाणात खरेदी सुरू आहे. काही विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलती, मेकिंग चार्जवर सूट, किंवा चांदीच्या वस्तू भेट म्हणून देण्याच्या ऑफरही दिल्या आहेत.
advertisement
दिवाळीत भाव स्थिर राहू शकतात
view commentsदिवाळीच्या मुहूर्तावर धनत्रयोदशीला आणि पाडव्याला अनेक नागरिक सोनेखरेदी करतात. मात्र दिवाळीत सोन्याचा भाव स्थिर राहू शकतो.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 16, 2025 6:02 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Rate In Diwali : दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करताय? काय असणार भाव? बाजारातून मोठी अपडेट समोर