नारायण राणे यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि तत्कालीन खासदार विनायक राऊत यांचं आव्हान आहे. तर रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरेंचा सामना शिवसेना उद्धव ठाकरेंच्या अनंत गिते यांच्याशी झाला.
नेटवर्क 18 च्या एक्झिट पोलमध्ये कोकणातल्या 3 जागांमध्ये कांटे की टक्कर बघायला मिळत आहे. या लढतींमध्ये महायुतीला 1 ते 3 तर महाविकासआघाडीला 0 ते 2 जागा मिळू शकतात.
advertisement
महाराष्ट्रात महायुतीची सरशी
नेटवर्क 18 च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 20 ते 22 जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष राहील, तर शिंदेंच्या शिवसेनेला 11 ते 13 जागा मिळू शकतात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1 जागा मिळेल, असा अंदाज आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीला 32 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीला 15 ते 18 जागा मिळू शकतात. यात काँग्रेसला 6 ते 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 ते 7 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 3 ते 6 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
नरेंद्र मोदींची हॅट्रिक
न्यूज 18 च्या या मेगा एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदी हॅट्रिक करताना दिसत आहेत. एनडीएला 543 पैकी 355 ते 370 जागांवर यश मिळताना दिसत आहे. तर इंडिया आघाडीला 125 ते 140 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. याशिवाय इतर पक्षांना 42 ते 52 जागा मिळण्याचा अंदाज आहे.