इथे पाहा लेटेस्ट Maharashtra Exit Poll 2024 Live Updates in Marathi
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरची जागा वगळता सर्व जागांवर विजय मिळवला होता. यंदा मात्र महायुतीला मराठवाड्यात फटका बसताना दिसत आहे. मराठवाड्यामधल्या 8 जागांपैकी महायुतीला 3 ते 6 तर महाविकासआघाडीला 2 ते 5 जागा मिळतील, असा अंदाज एक्झिट पोलने व्यक्त केला आहे.
advertisement
मराठवाड्यातल्या लढती
हिंगोली- बाबुराव कदम कोहळीकर (शिवसेना) विरुद्ध संजय देशमुख (शिवसेना उबाठा)
नांदेड- प्रतापराव चिखलीकर (भाजप) विरुद्ध वसंत चव्हाण (काँग्रेस)
परभणी- महादेव जानकर (रासप) विरुद्ध संजय जाधव (शिवसेना उबाठा)
धाराशीव - ओमराजे निंबाळकर (शिवसेना उबाठा) विरुद्ध जयश्री पाटील (राष्ट्रवादी)
लातूर- सुधाकर श्रुंगारे (भाजप) विरुद्ध शिवाजी काळगे (काँग्रेस)
जालना- रावसाहेब दानवे (भाजप) विरुद्ध कल्याण काळे (काँग्रेस)
छत्रपती संभाजीनगर- संदीपान भुमरे (शिवसेना) विरुद्ध चंद्रकांत खैरे (शिवसेना उबाठा)
बीड- पंकजा मुंडे (भाजप) विरुद्ध बजरंग सोनावणे (राष्ट्रवादी शरद पवार)
महाराष्ट्राच्या एक्झिट पोलमध्ये काय?
नेटवर्क 18 च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 20 ते 22 जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष राहील, तर शिंदेंच्या शिवसेनेला 11 ते 13 जागा मिळू शकतात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1 जागा मिळेल, असा अंदाज आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीला 32 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीला 15 ते 18 जागा मिळू शकतात. यात काँग्रेसला 6 ते 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 ते 7 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 3 ते 6 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
नरेंद्र मोदींची हॅट्रिक
न्यूज 18 च्या या मेगा एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदी हॅट्रिक करताना दिसत आहेत. एनडीएला 543 पैकी 355 ते 370 जागांवर यश मिळताना दिसत आहे. तर इंडिया आघाडीला 125 ते 140 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. याशिवाय इतर पक्षांना 42 ते 52 जागा मिळण्याचा अंदाज आहे.