देशभरात मोदी लाट असली तरी महाराष्ट्रात मात्र भाजपचं मिशन 45 प्लस यशस्वी होताना दिसत नाहीये. भारतातलं सर्वांत मोठं न्यूज नेटवर्क असलेलं न्यूज18 नेटवर्कनं भारतीय लोकशाहीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये महाविकासआघाडीला धक्का बसत असल्याचं दिसत आहे.
कुणाला किती जागा मिळणार?
भाजप- 20 ते 22
शिवसेना (शिंदे)- 11 ते 13
advertisement
राष्ट्रवादी (अजित पवार)- 0 ते 1
महायुती- 32 ते 35
काँग्रेस- 6 ते 9
शिवसेना (उद्धव ठाकरे)- 3 ते 6
राष्ट्रवादी (शरद पवार)- 4 ते 7
महाविकासआघाडी- 15 ते 18
एक्झिट पोलच्या या आकडेवारीनुसार निकाल लागले तर उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का असेल कारण महाविकासआघाडीमध्ये उद्धव ठाकरेंनी सर्वाधिक 22 जागा लढवल्या होत्या, यात त्यांना फक्त 3 ते 6 जागा मिळतील. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 2019 पेक्षा जास्त जागा निवडून येतील. 2019 ला काँग्रेसची फक्त 1 तर राष्ट्रवादीच्या 4 जागा निवडून आल्या होत्या.
महाराष्ट्रात भाजपने 28 तर शिवसेनेने 15 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागा लढवल्या होत्या. तर महाविकासआघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सर्वाधिक 22 जागा लढवल्या. काँग्रेसने 16 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा लढवल्या होत्या.