इथे पाहा लेटेस्ट Maharashtra Loksabha Exit Poll 2024 Live Updates in Marathi
विदर्भात कुणाचा सामना कुणाशी?
रामटेक - राजू पारवे (शिवसेना) विरुद्ध श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)
नागपूर - नितीन गडकरी (भाजप) विरुद्ध विकास ठाकरे (काँग्रेस)
भंडारा- गोंदिया - सुनिल मेंढे (भाजप) विरुद्ध प्रशांत पडोळे (काँग्रेस)
गडचिरोली-चिमूर- अशोक नेते (भाजप) विरुद्ध नामदेव किरसान (काँग्रेस)
advertisement
चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार (भाजप) विरुद्ध प्रतिभा धानोरकर ( काँग्रेस)
बुलडाणा- प्रतापराव जाधव (शिवसेना) विरुद्ध नरेंद्र खेडेकर (शिवसेना उबाठा)
अकोला- अनुप धोत्रे (भाजप) विरुद्ध प्रकाश आंबेडकर (वंचित) विरुद्ध अभय पाटील (काँग्रेस)
अमरावती- नवनीत राणा (भाजप) विरुद्ध बळवंत वानखेडे (काँग्रेस)
वर्धा- रामदास तडस (भाजप) विरुद्ध अमर काळे (राष्ट्रवादी शरद पवार)
यवतमाळ - वाशिम- राजश्री पाटील (शिवसेना) विरुद्ध संजय देशमुख (शिवसेना उबाठा)
महाराष्ट्राच्या एक्झिट पोलमध्ये काय?
नेटवर्क 18 च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 20 ते 22 जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष राहील, तर शिंदेंच्या शिवसेनेला 11 ते 13 जागा मिळू शकतात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1 जागा मिळेल, असा अंदाज आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीला 32 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीला 15 ते 18 जागा मिळू शकतात. यात काँग्रेसला 6 ते 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 ते 7 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 3 ते 6 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
नरेंद्र मोदींची हॅट्रिक
न्यूज 18 च्या या मेगा एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदी हॅट्रिक करताना दिसत आहेत. एनडीएला 543 पैकी 355 ते 370 जागांवर यश मिळताना दिसत आहे. तर इंडिया आघाडीला 125 ते 140 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. याशिवाय इतर पक्षांना 42 ते 52 जागा मिळण्याचा अंदाज आहे.