For Live Blog - इथे पाहा लेटेस्ट Maharashtra Loksabha Exit Poll 2024 Live Updates in Marathi
लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या निकालांकडे लागलं आहे. शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात एक्झिट पोलचे धक्कादायक आकडे आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या 11 जागांपैकी महायुतीला 4 ते 6 तर महाविकासआघाडीलाही 4 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रातल्या लढती
पुणे - मुरलीधर मोहोळ (भाजप) विरुद्ध रवींद्र धंगेकर (काँग्रेस)
शिरूर- शिवाजीराव आढळराव पाटील (राष्ट्रवादी) विरुद्ध अमोल कोल्हे, (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
अहमदनगर दक्षिण- सुजय विखे पाटील (भाजप) विरुद्ध निलेश लंके ( राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
माढा- रणजीतसिंह निंबाळकर (भाजप) विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
बारामती- सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
मावळ- श्रीरंग बारणे (शिवसेना) विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील (शिवसेना उ.बा.ठा.)
कोल्हापूर- संजय मंडलिक (शिवसेना) विरुद्ध शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस)
सांगली- संजय काका-पाटील (भाजप) विरुद्ध चंद्रहार पाटील (शिवसेना उ.बा.ठा.)
सोलापूर- राम सातपुते (भाजप) विरुद्ध प्रणिती शिंदे (काँग्रेस)
सातारा- उदयनराजे भोसले (भाजप) विरुद्ध शशिकांत शिंदे, (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
हातकणंगले- धैर्यशील माने (शिवसेना) विरुद्ध राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना) विरुद्ध सत्यजीत पाटील (शिवसेना उबाठा)
महाराष्ट्रात महायुतीची सरशी
नेटवर्क 18 च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 20 ते 22 जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष राहील, तर शिंदेंच्या शिवसेनेला 11 ते 13 जागा मिळू शकतात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1 जागा मिळेल, असा अंदाज आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीला 32 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीला 15 ते 18 जागा मिळू शकतात. यात काँग्रेसला 6 ते 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 ते 7 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 3 ते 6 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
नरेंद्र मोदींची हॅट्रिक
न्यूज 18 च्या या मेगा एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदी हॅट्रिक करताना दिसत आहेत. एनडीएला 543 पैकी 355 ते 370 जागांवर यश मिळताना दिसत आहे. तर इंडिया आघाडीला 125 ते 140 जागांवर समाधान मानावं लागू शकतं. याशिवाय इतर पक्षांना 42 ते 52 जागा मिळण्याचा अंदाज आहे.