न्यूज18 लोकमतवर सर्वात वेगवान आणि अचूक निकाल
न्यूज18 लोकमतनं संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या काळात अत्यंत जबाबदारी निवडणुकीचं कव्हरेज केलं. त्यानंतर आज दिवसभर जगभरातील मराठी प्रेक्षकांना न्यूज18 लोकमतवर या निवडणुकीचे सर्वात वेगवान आणि अचूक निकाल पाहाता येणार आहेत. निकालासोबतच त्याचे परिपूर्ण विश्लेषणही तज्ज्ञ जाणकरांकडून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.
advertisement
'न्यूज18 लोकमत'च्या मेगा एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज वर्तवण्यात आला. सर्वात मोठा आणि विश्वसनीय 'मेगा एक्झिट पोल'नुसार महायुतीचं 45+ स्वप्न अधुरं राहिल्याचं पाहायला मिळतंय. एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष असणार आहे. महाराष्ट्रात महायुतीला 32-35 जागांचा अंदाज असून मविआला 15-18 जागांचा अंदाज आहे. महाराष्ट्रात भाजपला 20-22 जागांचा अंदाज असून शिंदेंच्या शिवसेनेला 11-13 जागांचा अंदाज आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एका जागेचा अंदाज आहे. तर उबाठा पक्षाला 3 ते 6 जागांचा अंदाज आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला 6 ते 9 जागांचा अंदाज असून शरद पवारांच्या पक्षाला 4 ते 7 जागांचा अंदाज आहे.
महाराष्ट्राचा मेगा एक्झिट पोल
राज्यात महायुतीला 32-35 जागांचा अंदाज
राज्यात मविआला 15-18 जागांचा अंदाज
राज्यात भाजपला 20-22 जागांचा अंदाज
महाराष्ट्रात कोण उधळणार विजयाचा गुलाल?
निवडणूक लोकसभेची असली तरी राज्यातील जनतेचं लक्ष असणार आहे ते राज्यातील निकालांवर. राज्यात महायुती की मविआ कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. महायुतीनं आपण राज्यात 40 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा केलाय. तर मविआ नेतेही आपण 35 पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा करत आहेत. राज्यात अनेक मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.