Lok Sabha Election Results 2024 : आज लोकसभेचा निकाल! मोंदींची हॅट्रिक की काँग्रेसची सत्ता, जनतेची पसंती कोणाला?

Last Updated:

लोकसभा निवडणुकीच्या 543 जागांसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे

लोकसभेचा आज निकाल
लोकसभेचा आज निकाल
मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 च्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजेपासून सुरुवात होत आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे भारतासोबतच अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या 543 जागांसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. पोस्टल मतपत्रिका प्रथम मोजल्या जातील. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाईल
जवळपास अडीच महिन्यांच्या राजकीय रणधुमाळीनंतर लोकसभेच्या महाभारताचा आज फैसला होतोय. देशातील 543 लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे.. दिग्गज नेत्यांच्या सभा, रॅली, राजकीय आरोप- प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदाव्यानंतर देशभरातील मतदारांनी कुणाला कौल दिलाय? हे अवघ्या काही वेळात अखेर समोर येत आहे. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार? की इंडिया आघाडीला यश मिळणार? हे स्पष्ट होणार आहे.
advertisement
निवडणूक लोकसभेची असली तरी राज्यातील जनतेचं लक्ष असणार आहे ते राज्यातील निकालांवर. राज्यात महायुती की मविआ कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. महायुतीनं आपण राज्यात 40 पेक्षा जास्त जागा जिंकणार असा दावा केलाय. तर मविआ नेतेही आपण 35 पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा करताहेत. राज्यात अनेक मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. बारामती, माढा, शिरूर, बीड, अमरावती, संभाजीनगर, ठाणे, कोल्हापूर, सांगली या मतदारसंघामध्ये कांटे की टक्कर झाली. अनेक मतदारसंघामध्ये जनतेचा कौल नेमका कुणाला याचा अंदाज छातीठोकपणे कुणालाही वर्तवता येत नाही. मराठवाड्यात जरांगे फॅक्टर या मतदानात दिसणार का याची चर्चा आहे. तर राज्यात वंचितचा फटका कुणाला बसणार याची उत्सुकताही आहे. काहीच वेळात हा निकाल समोर येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Lok Sabha Election Results 2024 : आज लोकसभेचा निकाल! मोंदींची हॅट्रिक की काँग्रेसची सत्ता, जनतेची पसंती कोणाला?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement