रावेरमध्येही भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे आघाडीवर आहेत. रक्षा खडसे 13299 मतांनी आघाडीवर आहेत. रक्षा खडसे यांना 35088 तर, श्रीराम पाटील यांना 21613 मतं मिळाली आहेत.
जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यावेळी या मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ या महायुतीच्या उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली. मागील 20 वर्षांपासून जळगावात भाजपचाच खासदार आहे. आता यंदाचं या लोकसभा मतदारसंघातील चित्र काही तासात समोर येणार आहे.
advertisement
रावेर लोकसभा मतदारसंघात महायुती भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे आणि महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात घरवापसी करण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी घेतला. त्यामुळे एकनाथ खडेस यांचं पाठबळ रक्षा खडसेंना मिळाल्यानं रक्षा खडसे यांचं पारंड जड मानलं जात आहे
