महाराष्ट्राचे आजचे निकाल म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची अग्निपरीक्षा आहे, या अग्निपरिक्षेत कोण पास होणार? यावर महाराष्ट्राचं पुढचं राजकारण अवलंबून असणार आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना 21 जागा लढत आहे तर एकनाथ शिंदेंची शिवसेना 15 जागांवर लढत आहे.
महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने कल
नेटवर्क 18 च्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी 20 ते 22 जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष राहील, तर शिंदेंच्या शिवसेनेला 11 ते 13 जागा मिळू शकतात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 0 ते 1 जागा मिळेल, असा अंदाज आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीला 32 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीला 15 ते 18 जागा मिळू शकतात. यात काँग्रेसला 6 ते 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4 ते 7 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 3 ते 6 जागा मिळतील, असा अंदाज आहे.
advertisement