राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्याने जवळीक वाढली आहे. मोदींना पंतप्रधान करण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. राज ठाकरेंनी मोदींना पाठींबा द्यावा ही अपेक्षा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, तेव्हापासून मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मनसेकडून लोकसभेच्या तीन जागांची मागणी केली गेली, यात दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिकचा समावेश असल्याचं बोललं गेलं. यापैकी महायुतीने शिर्डीच्या जागेची घोषणा केली आहे, तर दक्षिण मुंबई आणि नाशिकचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही.
advertisement
राज ठाकरे काय बोलणार?
दरम्यान महायुतीमध्ये सहभागी व्हायच्या चर्चांवर राज ठाकरे हे उद्या म्हणजेच गुढीपाडवा मेळाव्यात बोलणार आहेत. '९ तारखेला शिवतीर्थावर या, नक्की काय घडलंय, काय घडतंय... हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे ! ', असा टिझर राज ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
