बोरिवली येथील एका तरुणी आणि शाहिद शेख नावाच्या तरुणामधील लिव्ह-इन रिलेशनशिप एग्रीमेंटवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा करार करण्यात आला असून, त्याची प्रत सोशल मीडियावर समोर आल्यानंतर हिंदू संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
२१ वर्षीय तरुणी बोरिवली येथे आपल्या कुटुंबियांसोबत रहात होती. मालाड येथे काॅलेज शिकत असताना तिची शाहिद शेख नावाच्या मुलासोबत ओळख झाली. कालांतराने दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. शाहिदसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर मुलीने पोस्ट केल्यानंतर कुटुंबियाना हीबाब लक्षात आली. कुटुंबियानी दरडावल्यानंतर काही महिन्यांपूर्वी मुलगी शाहिदसोबत पळून गेली. मुलीच्या आईने विश्वहिंदु परिषद संघटनेकडे मदत मागितल्यानंतर संघटनेच्या पदाधिकारयांच्या मदतीने परत आणण्यात आलं, मात्र काही दिवस उलटल्यानंतर मुलगी पून्हा घरातून पळून गेली. या मुलीचा शोध कुटुंबिय घेत असताना. मुलीने आपल्या 'लिव्ह इन रिलेशनशिप व्हिथ अग्रीमेंट' आईच्या मोबाइलवर पाठवल्यानंतर त्यांनाही धक्काचं बसला.
advertisement
संबधित पिडीत मुलीला दोन वेळा विश्व हिंदु परिषद संघटनेच्या कार्यकरत्यांनी स्वगृही परत आणले. मात्र मुलाच्या प्रेमात त्या मुलीने पुन्हा घर सोडले. मात्र हा एक सापळा असल्याचे विहिंपने म्हटले. अशाच प्रकारे मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अडकवले जात आहे. कायदेशीरबाबींपासून वाचण्यासाठी अशा प्रकारे करार करून पळवाटा काढल्या जात आहे. आम्ही या मुलीच्या शोधासाठी करारावरील पत्यावरही गेलो मात्र हा पत्ताही खोटा असल्याचे विहिंपचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी म्हटले.
मुलीचा विश्वास बसावा म्हणून अशा अनेक खोट्याबाबी या करारात लिहिल्याचे त्यांनी नमूद केले. हा नवा ट्रेंड असून अशा प्रकारे अनेक मुलीची फसवणूक होऊ शकते. अशा करारामुळे मुलींचं आयुष्य उद्धवस्त होऊ शकतं वेळीच मुंबई पोलिसांनी अशा घटना रोखण्यासाठी पाऊले उचलायला हवीत अशी मागणी प्रतिक्रिया विश्व हिंदु परिषद संघटनेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी केली.
