TRENDING:

TET Exam: टीईटी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ, अर्जदारांना 'या' तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

Last Updated:

TET Exam Form Last Date Extend: राज्यातल्या शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने टीईटी परिक्षेची घोषणा केली होती. या परिक्षेसाठी अर्ज भरण्यासाठीची शेवटच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राज्यातल्या शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने टीईटी परिक्षेची घोषणा केली होती. या परिक्षेसाठी अर्ज भरण्यासाठीची शेवटच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत अर्जदारांकडे अर्ज भरण्याची मुदत होती. पण आता टीईटी परिक्षेचा अर्ज भरण्याची तारीख पुढे ढकलली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रतेसाठीच्या परिक्षेचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 9 ऑक्टोबर असणार आहे. अर्जदारांना 9 ऑक्टोबरच्या रात्री 11:59 पर्यंतची अर्ज भरण्यासाठीची मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य, दिवाळीच्या सुट्टीत करा जोमात अभ्यास; नापास झालात तर..
शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य, दिवाळीच्या सुट्टीत करा जोमात अभ्यास; नापास झालात तर..
advertisement

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे टीईटीकडून परीक्षार्थी उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे परीक्षार्थी आणि उमेदवारांना ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी 9 ऑक्टोबर रात्री 11:59 पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षक पदासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा फार गरजेची असते. या परीक्षेला TET असं म्हणतात. ही महाटीईटी (MAHATET 2025) परीक्षा सर्व व्यवस्थापनामधील, ज्यात शासकीय, अशासकीय, कायम विना अनुदानित शाळा, सर्व बोर्ड आणि माध्यमांतील इयत्ता 1ली ते 8वी च्या शिक्षकांसाठी ही परीक्षा अनिवार्य असते.

advertisement

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अनेक अर्जदारांना तांत्रिक अडचणींमुळे अर्जामध्ये अनेक गोष्टी भरता आल्या नव्हत्या. आता त्या सर्व अर्जदारांना 9 ऑक्टोबरपर्यंतचा अवधी असणार आहे. सोबतच, ज्या अर्जदारांना तांत्रिक अडचणींमुळे परीक्षा शुल्क भरता आले नव्हते. त्या अर्जदारांसाठी नेट बँकिंग/ डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड द्वारे विहित कालावधीत मुदतवाढ देण्यात येत आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही. या परिक्षेबद्दलची अधिक सविस्तर माहिती परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावरून वेळोवेळी मिळत राहिल. परिक्षेच्या तारखेतही काही बदल करण्यात येणार आहे का ? याबद्दलची माहिती मिळालेली नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
यंदा 6 की 7 ऑक्टोबर कधी आहे कोजागिरी पौर्णिमा? पूजा विधी आणि संपूर्ण माहिती
सर्व पहा

दरम्यान, ज्या उमेदवारांनी अर्ज भरले होते, त्यांना प्रवेशपत्र 10 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. तर, परीक्षा 23 नोव्हेंबरला होणार आहे. पहिला पेपर 23 नोव्हेंबरला सकाळी 10: 30 ते दुपारी 01:00 वाजेपर्यंत होणार आहे, तर दुसरा पेपर 23 नोव्हेंबरलाच दुपारी 02:30 ते सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
TET Exam: टीईटी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ, अर्जदारांना 'या' तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल