ठाणे महापालिकेमध्ये शिवसेना 34 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपला 24 जागांवर आघाडी मिळाली आहे. याशिवाय राष्ट्रवादीला 4, काँग्रेसला 3, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 5, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 1 जागेवर आघाडी मिळाली आहे. 131 जागांच्या ठाणे महापालिकेमध्ये शिवसेना-भाजप युतीमध्ये लढले होते, ज्यात शिवेसनेने जास्त जागांवर निवडणूक लढली.
दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीमध्ये असलेल्या 122 जागांपैकी शिवसेना 51 जागांवर, भाजप 41 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 8 जागांवर, काँग्रेस, 2, मनसे 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे. ठाण्याप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीमध्येही शिवसेना-भाजप युतीमध्ये निवडणूक लढवत होते.
advertisement
उल्हासनगरमध्येही शिवसेना आघाडीवर
ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीशिवाय उल्हासनगरमध्येही शिवसेना बहुमताच्या जवळ पोहोचली आहे. विशेष म्हणजे उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भाजप युतीमध्ये लढले नव्हते. सध्या उल्हासनगरच्या 78 जागांपैकी शिवसेना 36 जागांवर, भाजप 30 जागांवर, वंचित बहुजन आघाडी 2 जागांवर आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. उल्हासनगरमध्ये बहुमतासाठी 40 जागांची गरज आहे, त्यामुळे शिवसेनेला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आणखी 4 जागांची गरज आहे. उल्हासनगरमध्ये शिवसेना ही ओमी कलानी यांच्या पक्षासोबत युती करून लढत आहे.
उल्हानगरमध्ये शिवसेनेला मिळालेलं हे यश म्हणजे भाजपसाठी धक्का मानलं जात आहे, कारण याआधी 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला 32, शिवसेनेला 25 आणि इतर पक्षांना 11 जागांवर यश मिळालं होतं.
