पुन्हा पावसाचा धोका
हवामान तज्ज्ञ शशिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरीकडे अरबी समुद्रातही सध्या वारे वेगानं वाहात आहेत. त्यामुळे तिथेही कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. डीप डिप्रेशन काही किलोमीटर अंतरावर तयार झालं आहे. या सगळ्यामुळे महाराष्ट्रात देखील पुढचे 48 तास मुसळधार पाऊस राहणार आहे. वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अलर्ट जारी केला आहे.
advertisement
दमट हवामानाने घामाच्या धारा
दिवसा दमट हवामान, त्यामुळे वाढणारा उकाडा यामुळे हैराण व्हायला होत आहे. त्यात संध्याकाळी, पहाटे किंवा दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसानं थोडावेळ गारवा निर्माण होतो मात्र पुन्हा उकाडा वाढत आहे. पुढचे 48 तास महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. दिवाळीनंतरही पावसाचं संकट कायम आहे. 24 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा मुसळधार पाऊस महाराष्ट्रात पडणार आहे.
हवामान तज्ज्ञ शशिकांत मिश्रा यांनी दिली महत्त्वाची अपडेट
हवामान तज्ज्ञ शशिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबर रोजी काही भागांमध्ये मध्य महाराष्ट्र, तळ कोकणात मुसळधार पाऊस राहील तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. 26 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस होईल. कोकणात मात्र दिलासा मिळणार नाही.
कधी जाणार पाऊस?
कमी दाबाचे क्षेत्र जर तीव्र झाले नाही तर 27 ऑक्टोबर पासून पावसापासून सुटका मिळू शकते. जर लो प्रेशर वाढलं तर मात्र ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे. मात्र सध्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार तरी 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट नसेल. त्यामुळे अवकाळी पावसापासून आता सुटका होणार आहे. तर गुलाबी थंडींची लोक आतूरतेनं वाट पाहात आहेत. ला निनामुळे यंदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.