शिक्षण मंडळाच्यावतीने सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. बारावीच्या निकालाप्रमाणे दहावीचा निकालही डिजीलॉकरवर पाहता येणार आहे.
>> दहावीचा निकाल कसा पाहायचा? (Step-by-step Process)
1. निकालासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या
2. ‘SSC Examination Result 2025’ लिंकवर क्लिक करा
advertisement
3. तुमचा Roll Number आणि आईचं नाव (Mother’s Name) टाका
4. ‘View Result’ बटणावर क्लिक करा.
>> इथं पाहा झटपट दहावीचा निकाल...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. पुढील काही वेबसाईटवर निकाल पाहता येतील.
> https://results.digilocker.gov.in
> https://sscresult.mahahsscboard.in
> http://sscresult.mkcl.org
> https://results.targetpublications.org
> https://results.navneet.com