महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा दर वर्षीच्या तुलनेत 10 दिवस लवकर घेतल्या. निकालही 15 मेपूर्वी जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार, बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर करण्यात आला. राज्यातील एकूण 15 लाख 58 हजार 20 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी एकूण 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यात दहावीचा निकाल 94.10 टक्के इतका लागला आहे.
advertisement
राज्याचा निकाल किती?
राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के इतका लागला आहे. दहावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागात 98.82 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला. नागपूर विभागात 90.78 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
राज्याच्या दहावीच्या परीक्षेत मुलींची कामगिरी सरस ठरली आहे. राज्यात 96.14 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, 92.21 टक्के मुलं विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.
किती विद्यार्थ्यांना मिळालं काठावरचं यश?
एकूण 211 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले. यामधील निम्मे विद्यार्थी हे लातूर विभागातील असल्याची माहिती महाराष्ट्र शिक्षण बोर्डाने दिली. तर एकूण 285 विद्यार्थ्यांनी काठावर गुण मिळवत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली.
कोणत्या विभागात किती विद्यार्थी 35 टक्के गुणांनी उत्तीर्ण?
- पुणे 59
- नागपूर 63
- छत्रपती संभाजी नगर 28
- मुंबई 67
- कोल्हापूर 13
- अमरावती 28
- नाशिक 9
- लातूर 18
- कोकण 0
दहावीचा निकाल इथं पाहा...
इथंही पाहता येईल निकाल...
पुढील काही वेबसाईटवर निकाल पाहता येतील.
> https://results.digilocker.gov.in
> https://sscresult.mahahsscboard.in
> http://sscresult.mkcl.org
> https://results.targetpublications.org
> https://results.navneet.com