विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेत आले.त्यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला काही दिलासा मिळणाऱ्या घोषणा होतात का हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे अजित पवार सादर करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पीय भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अजितदादांच्या कविता...
अजित पवारांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला कवितांची पेरणी केली. अजितदादांनी म्हटले की, जनतेने महायुतीला अभूतपूर्व कौल दिला. मतदारांनी विश्वास हा जबाबदारीची जाणीव करून देणारा असून आम्हाला, सरकारला याची जाणीव आहे. केंद्र सरकारने आयकरात सूट देऊन मध्यमवर्गाला दिलासा दिला, रेल्वे-पायाभूत सुविधांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
लाडक्या बहिणींचा उल्लेख...
अजित पवार यांनी कवितांच्या ओळी सादर करत लाडक्या बहिणींचा उल्लेख केला. लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, कोटी प्रियजनांना मान्य झालो, विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो, पुन्हा आलो असे अजित पवार यांनी म्हणतात सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी जोरदार बाके वाजवून प्रतिसाद दिला.
अजित पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्र आता थांबणार नाही. विकास आता लांबणार नाही उद्योग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीसाठी सतत प्रयत्न म्हणून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे थेट बँकेत पैसे जमा होत असल्याने क्रयशक्ती वाढली. बाजारात पैसा फिरत आहे. खरेदी विक्री वाढली आहे. दावोसमध्ये केलेल्या करारातून 16 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित 100 दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. जनतेच्या तक्रारींचे निवारण केले जात आहे. या कार्यक्रमातून गतीमान प्रशासन होईल. राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल हा कार्यक्रम निरंतर ठेवण्यात येईल. महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण तयार केले जात आहे. 40 लाख कोटींची गुंतवणूक व 50 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले.
