या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेत आले.त्यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला काही दिलासा मिळणाऱ्या घोषणा होतात का हे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील अर्थ संकल्प हा विधानसभा निवडणुकीपूर्वीचा असल्याने त्यावेळी अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्यात आला होता. मात्र, त्याचा भार सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर पडला.
advertisement
करात वाढ होणार?
महसूल वाढीचे नवे मार्ग शोधताना सरकारला उत्पन्न देणाऱ्या मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, मद्य, इंधन यावरील करात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी सरकारी तिजोरीवर भार टाकणाऱ्या नव्या योजनांचा समावेश अर्थसंकल्पात होण्याची शक्यता कमी आहे. तर राज्यातील तरुण, शेतकरी आणि मजूर यांच्या अपेक्षांना न्याय देताना राज्य सरकारची कसोटी लागणार आहे.
अर्थसंकल्पातून मोठ्या अपेक्षा...
अर्थसंकल्पातून शेतकरी, तरुण, उद्योजक, महिलांना, नोकरदार अशा विविध स्तरातील घटकांना मोठ्या अपेक्षा आहेत. निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज माफीची अपेक्षा आहे. तर, दुसरीकडे लाडकी बहीण योजनेतंर्गत महिलांना 1500 हून 2100 रुपयांचे मानधन मिळणार का, याकडेही राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. उद्योगांसंबंधी,रोजगाराच्या अनुषंगांने सरकार कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार, याकडेही लक्ष लागले आहे.
