नवी दिल्ली : भाजपच्या सोबत जाण्यासाठी ज्यांनी बंडाचं निशाण फडकावलं त्या भाजप आणि शिवसेनेतच आता वादाची ठिणगी पडलीय. स्थानिक पातळीवरच्या फोडाफोडीच्या राजकारणानं गंभीर रुप घेतलंय. हा वाद आत्ता थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह (Amit shah) यांची भेट झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या वेळी एकनाथ शिंदेंनी भाजपने शिवसेना नेत्यांचे प्रवेश केल्यामुळे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
advertisement
राज्यात मंगळवारी भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढलेला असताना शिंदे दिल्लीमध्ये पोहचले. दिल्लीत पोहचल्यानंतर त्यांनी अमित शाहांची निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली.
शिंदेंनी अमित शाहांकडे काय तक्रारी केल्या?
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदार संघात भाजपकडून शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश दिला जात असल्यानं शिंदेंच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. नेमकी हीच नाराजी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यासमोर केली. महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याचं एकमताने ठरले असताना भाजपने ऐनवेळी भाजपने वेगळी चूल मांडल्याचे सांगत याविषयी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भेटीचं नेमकं कारण समोर
एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची तक्रार देखील अमित शहा यांच्याकडे केल्याची माहिती देखील समोर आली आहे. महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांना पक्षात प्रवेश देऊन ताकत दिल्यामुळे शिवसेनेतील नेते नाराज असल्याची माहिती देखील भाजप पक्षश्रेष्ठींना शिंदेंनी दिल्याची माहिती अमित शाहांना दिली आहे.
मतभेद दूर करण्याचं मोठं आव्हान
शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला होता. त्यानंतर शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे दिल्लीला गेल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यात तीन पक्ष असलेल्या महायुतीचं सरकार सत्तेत आहे. या सरकारमध्ये भाजप हा मोठा भाऊ आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेंच सुरू आहे.यातून महायुतीत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. आता मतभेद दूर करण्याचं मोठं आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर आहे.
हे ही वाचा :
