6 महिन्यांच्या धुसफुसीनंतर महायुतीत भूकंप, KDMCमध्ये शिंदेंची सेना का फोडली? ऑपरेशन लोटसची इनसाईड स्टोरी

Last Updated:

कल्याण- डोंबिवलीत अंतर्गत नाराजीमुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर अघोषित बहिष्कार टाकला आहे.

News18
News18
कल्याण- डोंबिवली:  नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक पातळीवर नवीन राजकीय समीकरणे समोर येत आहे. मात्र सत्ताधारी महायुतीच्या गोटात प्रचंड अंतर्गत खदखद असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण- डोंबिवलीतील मिशन लोटसवरून शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली आहे. याच अंतर्गत नाराजीमुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर अघोषित बहिष्कार टाकला आहे.
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपने फासे टाकायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील अनेक माजी नगरसेवकांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यापूर्वी भाजपकडून प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेचे दिवंगत नेते वामन म्हात्रे यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हातात धरले. आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी विशेषत: श्रीकांत शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात असून याची नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवसेनेने बहिष्कार टाकल्याचे समोर आले आहे.
advertisement

सहा महिन्यांमध्ये पडद्यामागे अनेक घडामोडी

गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीतील मित्र पक्षांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्री- कॅबिनेटच्या आधी धाराशिवमध्ये जो निधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास न घेता तो घेण्यात आला होता. एकनाथ शिंदेंचे अनेक निर्णय रद्द करण्यात आले होते, तेव्हापासून ही धूसफूस असल्याचे म्हटले आहे. मागील सहा महिन्यांमध्ये पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू आहे. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते भाजपमध्ये घेण्याचे सुरू आहे. तसेच खिंडार थांबवण्याचे काम शिंदेकडून होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज संभाजीनगरमध्ये संजय शिरसाठी यांच्या विरोधात जे राजू शिंदे निवडणूक लढवत आहे, ते भाजपमध्ये प्रवेश केल्याचा पाहायला मिळाले आहे, याचा अर्थ असा आहे की शिवसेनेला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून शह देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाी चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात रंगली आहे.
advertisement

KDMCमध्ये शिंदेंची सेना का फोडली?

शिवसेनेचे सर्व नसले तरी काही मंत्री बैठकीला उपस्थित होते.शिंदेंच्या मंत्र्यांनी बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली. डोंबिवली प्रवेशावर शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे आणि भाजपाने केले तर चालणार नाही, असे होणार नाही. येथून पुढे आता एकमेकांना प्रवेश देऊ नका, पण पथ्य दोन्ही पक्षांनी पाळावे.
advertisement

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील? 

गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला एकनाथ शिंदे यांनी नगरपालिका, नगरपंचात निवडणुकांची रणनीती आखण्याचे काम दिले होते. परंतु सर्वात मोठा मुद्दा आहे की, कॅबिनेट सुरू असताना अशी कोणती रणनीती आखण्याची होती? असा सवाल सध्या विचारला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
6 महिन्यांच्या धुसफुसीनंतर महायुतीत भूकंप, KDMCमध्ये शिंदेंची सेना का फोडली? ऑपरेशन लोटसची इनसाईड स्टोरी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement