परीक्षा नाही, थेट मुलाखत होणार; 'या' उमेदवारांना बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी
कुटुंबातल्या मुख्य व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याच्या जागी त्याच्या कुटुंबातील पात्र वारसाला नोकरी मिळणे म्हणजे अनुकंपा तत्व. पण याच नोकऱ्या त्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मिळत नाहीये. सरकारने मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले असताना, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सरकारच्या या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. सरकारने मृत व्यक्तीच्या नातेवाईकांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, आमच्या लाख मोलाच्या नोकऱ्या का म्हणून फुकट द्यायच्या? असा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सरकारला विचारला आहे. याबाबतचा योग्य तो निर्णय सरकारने लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणीही समितीने केली.
advertisement
मुंबईत घर घेणं परवडत नाही! 81 टक्के लोक हेच म्हणतात, सर्व्हेतून धक्कादायक माहिती
राज्यातील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये जवळपास 9 हजार 658 रिक्त जागा असून, या सर्व जागा भरण्यात येणार आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनुकंपा तत्त्वावरील भरती होत आहेत. प्रतीक्षेत असलेल्या जवळपास 10 हजार उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक वर्षांपासून राज्यात नोकरभरती झालेली नाही. त्यामुळे अनेक सरकारी कार्यालयांमध्ये, खासगी कंत्राटदार कंपनीमार्फत नोकरभरती केली जात होती. त्यांच्या मार्फत अनेक पद भरले होते. पण आता गेल्या अनेक महिन्यांपासून खासगी कंत्राट कंपनीमार्फत नोकरभरती बंद करण्यात आली आहे. कंत्राट पद्धतीने नोकर भरती न होता, अनुकंपा तत्वावर नोकर भरती होणार आहे.
शेतीच्या जोरावर करून दाखवलं, तीन मुलांना लावली नोकरी अन् बांधला 1 कोटींचा बंगला
अनुकंपा तत्वाच्या माध्यमातून, चतुर्थ श्रेणीतील जागा भरल्या जाणार आहेत. आतापर्यंत या श्रेणीतील बहुतेक पदे खासगी कंत्राटदारामार्फत भरण्यात येत होती. मात्र आता अनुकंपा वरील जागा थेट पात्र वारसांना मिळणार आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य आणि नोकरीच्या माध्यमातून सुरक्षितता मिळेल. ही नियुक्ती प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. १५ सप्टेंबर २०२५ पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती सुरू होणार आहे. याशिवाय, सरकारने प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अर्जापासून ते नियुक्ती पर्यंतच्या टप्प्यातील अडचणी कमी होणार आहेत.