TRENDING:

IAS Transferred: मंत्रिमंडळ बैठकीदिवशीच २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Last Updated:

Maharashtra Ias Transferred: राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील दोन बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून काही ठराविक अंतराने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला कायम आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
advertisement

देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे हातात घेतल्यापासून प्रशासकीय वर्तुळात वेगाने खांदेपालट होत आहे. मागील काही महिन्यांत मंत्रिमंडळ बैठकीदिवशी काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यातही कायम आहे.

कुणाची कुठे बदली?

१) सिद्धराम सालीमठ (आयुक्त, साखर, पुणे) यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सालीमठ हे २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

advertisement

२) विकास मारुती पानसरे (अतिरिक्त विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई) यांची व्यवस्थापकीय संचालक, MSSIDC, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. विकास पानसरे हे २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

कोण आहेत सिद्धराम सालीमठ?

सिद्धराम सालीमठ हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यातील अहमदनगर म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगरमध्ये त्यांनी ई-ऑफिस ही संकल्पना अतिशय यशस्वीपणे राबवली. नगर जिल्ह्यातील त्यांच्या कामाचे विशेष कौतुक झाले. राहुरीच्या कृषी विद्यापीठातून त्यांनी एमएससी केली. प्रशासनाचा दांगडा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

advertisement

IAS सिद्धराम सालीमठ यांची प्रशासकीय कारकीर्द

साखर आयुक्त, अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडकोचे महव्यवस्थापकीय संचालक, नगरविकास विभागाचे उपसचिव, महसूल उपायुक्त

IAS विकास पानसरे यांची प्रशासकीय कारकीर्द

विकास पानसरे हे २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.पानसरे मूळचे संगमनेर जिल्ह्यातील असून शिर्डीचे ते जावई आहेत. याआधी त्यांनी अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिले. त्यानंतर कोकण विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS Transferred: मंत्रिमंडळ बैठकीदिवशीच २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल