Jalna Rain: जालन्यात ढगफुटी! फर्निचरची दोन दुकाने गेली वाहून, लाखोंचे नुकसान, Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Jalna Rain: जालना शहरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील फर्निचरची दोन दुकाने वाहून गेली असून लाखोंचे नुकसान झाले आहे.
जालना: संपूर्ण राज्यात पावसाचे धुमशान पाहायला मिळतंय. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात 15 सप्टेंबरच्या रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. रात्री बारा ते सकाळी तीनच्या दरम्यान केवळ तीनच तासात 116 मिलिमीटर पाऊस झाल्याने शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना या दोन्ही नद्या दुधडी भरून वाहू लागल्या. नद्यांच्या पुराचं पाणी घरांत आणि दुकानांत शिरल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे.
सीना आणि कुंडलिका या दोन्ही नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीच्या काठी असलेल्या व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जालना शहरातील बस स्टँड परिसरात असलेल्या पुलावरून कमरे एवढं पाणी वाहिल्याची घटना 1993 नंतर पहिल्यांदाच घडली. यामुळे काही काळ जालना ते छत्रपती संभाजी नगर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
advertisement
जालना शहरातील व्यवसायिक नंदकिशोर चौधरी यांचे लक्कडकोट भागात सीना नदीच्या तीरावर फर्निचरचे दुकान होतं. रात्री दीड वाजेच्या सुमारास नदीला मोठा पुराला या नदीच्या पाण्यात त्यांचं दीड ते दोन लाखांचं नुकसान झालंय. फर्निचरच्या तयार झालेल्या वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्यात. ते घरासाठी लागणारे दरवाजे, देवघर, कोट आणि इतर फर्निचरच्या वस्तू पुरामध्ये वाहून गेल्यात. त्याचबरोबर दुकानातील सर्व साहित्य सह अर्ध दुकान नदीच्या पाण्या वाहून गेलंय.
advertisement
“आमचं लाकडाचे दुकान आणि रसवंती होती सगळं वाहून गेलं आणि आम्हाला कळलंच नाही. या पुरामुळे आमचं दोन ते तीन लाखांचं नुकसान झालंय. यामध्ये रसवंतीची मशीन, रंधा मशीन, आरा मशीन आणि लाकडी वस्तू वाहून गेल्यात. आमची सगळी दुकानं वाहून गेली आहेत. आमची उपजीविका या दुकानांवरच होती, हे सांगताना दुकान मालक कैलास पवार यांना अश्रू अनावर झाले. यावेळी सरकारने आमची मदत करावी, अशी मागणी नुकसान झालेल्या व्यावसायिकांनी केली आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
September 16, 2025 6:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Jalna Rain: जालन्यात ढगफुटी! फर्निचरची दोन दुकाने गेली वाहून, लाखोंचे नुकसान, Video