2022 ते 2025 या वर्षांमध्ये सरकारी नोकरीसाठी लागणारे वय पूर्ण झालेल्या उमेदवारांना एक अखेरची संधी म्हणून अर्ज भरण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यामुळे नियमित सराव करणार्यांसह वय ओलांडणाऱ्यांनीही ‘खाकी वर्दीचे स्वप्न’ पूर्ण करण्यासाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. यासह पोलिस घटकांनीही आगामी निवडणुकींसह सणोत्सवाचा आढावा घेत भरतीचे नियोजन हाती घेतले आहे. गृह मंत्रालयाने पोलिस भरती जाहीर केल्यापासून राज्यातील प्रत्येक कानाकोपर्यातील तरूणांनी पोलिस भरतीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
advertisement
सर्वाधिक रिक्त पदे मुंबई शहर, मीरा- भाईंदर, पुणे शहर, ठाणे शहर आणि मुंबई रेल्वे पोलिस येथे आहे. त्याप्रमाणे उमेदवारांचा कल तिकडे सर्वाधिक आहे. मुंबई शहर 2459, ठाणे शहर 867, नवी मुंबई 88, नाशिक ग्रामीण 172, मीरा- भाईंदर 924, पुणे शहर 885, पिंपरी चिंचवड 356, छत्रपती संभाजीनगर 150, नागपूर शहर 398, मुंबई रेल्वे पोलिस 743, जळगाव 171 आणि धुळे 137 अशी भरती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये केली जाणार आहे. तर, संपूर्ण जिल्ह्यामध्ये, पोलिस शिपाई पदासाठी 10, 908 इतकी पदे, पोलिस वाहनचालक पदासाठी 234 इतकी पदांची भरती केली जाणार आहे. एकूण 11,167 पदांचीही भरती होत आहे.
तर, एसआरपीएफमध्येही नोकरभरती केली जाणार आहे. पोलिस शिपाईंसाठी 1062 पदे आणि अनुकंपा तत्वावर 19 पदांची भरती केली जाणार आहे. शिवाय, आंतरजिल्हा स्तरावरही 1350 पदांची भरती केली जाणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ‘खाकी वर्दी’चे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांची भरतीसाठीची तयारी जोमाने सुरू आहे. अद्याप भरतीच्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही.
उमेदवार एकपेक्षा जास्त अर्ज नोंदवू शकत नाही. सर्व पदांसाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा असेल, ५०गुणांची शारीरिक चाचणी, त्यानंतर एका पदासाठी १० उमेदवारांची निवड केली जाईल, पात्र उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा, शेवटी कागद पडताळणी, त्यानंतर अंतिम निवड यादी करण्यात येईल, अशी पोलिस भरती असेल.