राजेश मोरे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, 'संजय राऊत भडवेगिरीचे काम करत आहेत. शिवसैनिक त्यांना घरात घुसून मारल्याशिवाय शांत बसणार नाहीत.' आनंद दिघे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेल्या कथित चुकीच्या वक्तव्याबद्दलही त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला. संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत राजेश मोरे यांनी राऊतांना राहुल गांधी आणि शरद पवार यांच्याकडून सुपारी घेतल्याचा आरोप केला आहे.
advertisement
दरम्यान, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या विरोधात 'जोडे मारो' आंदोलनही केले. या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी संजय राऊत यांना थेट आव्हान दिले आहे. 'संजय राऊत यांनी चर्चेचा विषय घ्यावा, डिबेट ठेवावे, आम्ही शिवसैनिक येतो,' असे खुले आव्हानही आंदोलकांनी दिले आहे.
कोण आहेत राजेश मोरे?
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राजेश मोरे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तत्कालीन एकमेव आमदार राजू पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. राज्यात 2024 विधानसभा निवडणुकीत राजू पाटील यांची जागा निवडून येणार अशी सर्वांना खात्री होती. मात्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी इथे स्वतः प्रचाराची सूत्रे हाती घेत विजय खेचून आणला असे बोलले जाते. त्यामुळे राजेश मोरे जायंट किलर ठरले होते. मोरे यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेवक होते.