विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र 7 नोव्हेंबरपासून थंडी अनुभवायला मिळणार आहे. मोंथा चक्रीवादळ आणि डिप डिप्रेशनमुळे राज्यात पुन्हा अवकाळी पावसाने एन्ट्री केली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा मोठा फटका बसत आहे.
7 नोव्हेंबरपासून राज्यात हळूहळू गुलाबी थंडी अनुभवायला मिळू शकते. पश्चिमी चक्रीवादळाचा परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यावर दिसून येणार आहे. यंदा ला निनाचा परिणाम देखील दिसून येणार आहे. नेहमीपेक्षा जास्त थंडी वाढणार असल्याचं हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी 2026 या दरम्यान देशभरातील तापमान 54 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.
advertisement
या काळात पॅसिफिक महासागराकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर भारतात कडाक्याची हाडं गोठवणारी थंडी राहील. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान ला नीना विकसित होण्याची शक्यता 50 टक्क्यांहून अधिक आहे. पॅसिफिक महासागरातील थंडीमुळे उत्तरेकडील राज्ये हिमालयीन भागात अधिक कडाक्याचा हिवाळा आणि हिमवृष्टी होते. ला निनामुळे उत्तर भारतात यावेळी तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे.
डॉ. सुप्रित कुमार हवामान तज्ज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 7 ऑक्टोबर रोजी पुन्हा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस बरसणार आहे. अवकाळी पावसामुळे थंडी लांबणीवर गेली आहे. दुपारी मे महिन्यासारखं हवामान आणि पहाटे आणि संध्याकाळी अचानक धो-धो कोसळणारा पाऊस यामुळे वातावरण विचित्र झालं आहे. 8 ते १० नोव्हेंबर दरम्यान हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. त्यानंतर अवकाळी पावसाचा जोर कमी होईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
