महाराष्ट्रातील शाळा उद्यापासून बंद
मकरसंक्रांत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळांसाठी सुट्टी जाहीर केली आहे. याचबरोबर मतदान केंद्र असलेल्या शाळा आणि कार्यालयांना देखील सुट्टी दिली आहे.
पुन्हा शाळा कधी सुरु होणार?
शाळा १४ जानेवारीपासून सुट्टीसाठी बंद राहतील आणि पुढील सोमवारी म्हणजेच 19 जानेवारी रोजी पुन्हा सुरू होतील. 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांत असल्यामुळे ही सुट्टी सुरू होत आहे. त्यानंतर 15 आणि 16 जानेवारीला महापालिका निवडणुका आहेत. 15 जानेवारीला मतदान होईल आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे शाळांना या काळात सुट्टी देण्यात आली आहे. अनेक शाळांमध्ये मतदान केंद्र असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
याशिवाय सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना निवडणुकीसाठी ड्युटी लागली आहे. महापालिका भागातील अनेक शिक्षक मतदान प्रक्रियेत सहभागी असतील त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानासाठी ज्या शाळांमध्ये केंद्र स्थापन केले गेले आहे, त्या इमारतींमधील कामकाज 14 आणि 15 जानेवारीला बंद ठेवले जाईल.
प्रशासनाने मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. मतदानाच्या दिवशी आणि त्यापूर्वी कर्मचारी आणि अधिकारी मतदान साहित्याची वाटप, मतदान यंत्रांची वाहतूक, मतदान कक्षांची मांडणी, कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था याची तयारी करतील. या सर्व कारणांमुळे शाळांना सलग 5 दिवस सुट्टी देण्यात येत आहे.
