अटक वॉरंट जारी होण्याची दाट शक्यता
राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) पुन्हा अडचणीत आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यामुळे कोकाटे यांच्याविरोधात आज दिवसभरात अटक वॉरंट जारी होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी प्रथम वर्ग न्यायालयाने या प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षे कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. कोकाटे यांनी या शिक्षेविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात अपील केले होते.
advertisement
बनावट दस्तऐवज तयार करून सदनिका लाटल्या
मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली असून, त्याचबरोबर कोकाटे यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका या बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणात कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची न्यायालयाने सुनावली होती.
प्रकरण बाहेर कसं आलं?
दरम्यान, या संदर्भात मूळ तक्रार दिवंगत माजीमंत्री तुकाराम दिघोळे यांनी केली होती. मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला सत्र न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली होती. तेव्हा माजीमंत्री दिघोळे यांची कन्या ॲड. अंजली दिघोळे-राठोड यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.
