TRENDING:

Eid Holiday: ईदच्या सुट्टीत राज्य सरकार बदल करणार, आजच GR निघण्याची शक्यता

Last Updated:

Eid Holiday Change: मुस्लिम समाजाच्या निर्णयाची नोंद घेऊन ५ सप्टेंबर रोजी जाहीर केलेली शासकीय सुट्टी ८ सप्टेंबर रोजी द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते तथा माजी मंत्री नसीम खान यांनी केली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांसाठी ईदच्या शासकीय सुट्टीत राज्य शासन बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ५ सप्टेंबरच्या ऐवजी ८ सप्टेंबरला ईदची सुट्टी देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भातील शासकीय निर्णय आजच जारी होण्याची शक्यता आहे.
ईदच्या सुट्टीत बदल होणार
ईदच्या सुट्टीत बदल होणार
advertisement

मुस्लिम समाजाचा पवित्र सण अर्थात मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर रोजी आहे. तर ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे. त्यामुळे ५ तारखेची मोहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणूक ८ सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतलेला आहे.

मुस्लिम समाजाच्या आवाहनानंतर राज्य सरकारने सु्ट्टीत केला बदल

मुस्लिम समाजाच्या निर्णयाची नोंद घेऊन ५ सप्टेंबर रोजी जाहीर केलेली शासकीय सुट्टी ८ सप्टेंबर रोजी द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते तथा माजी मंत्री नसीम खान यांनी केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन राज्य सरकारने सुट्टी बदलण्याचा निर्णय घेतल्याचे कळते आहे. मुस्लिम समाजाचे आवाहन लक्षात घेऊन मुंबई शहर आणि उपनगरांत ५ सप्टेंबरच्या ऐवजी ८ सप्टेंबरला ईदची सुट्टी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई वगळत इतर जिल्ह्यांमध्ये मात्र ५ सप्टेंबरलाच ईदची शासकीय सुट्टी असेल.

advertisement

ईदच्या सुट्टीसंदर्भात नसीम खान यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

ईदच्या सुट्टीसंदर्भात काँग्रेस नेते नसीम खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. राज्यात बंधुभाव आणि हिंदू मुस्लिम एकोपा अबाधित राखण्यासाठी मुंबईत विविध मुस्लिम संघटनांनी गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया खिलापत कमिटीमध्ये बैठक घेतली. मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी मुंबईत काढण्यात येणारी मिरवणूक ही सोमवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे, जेणेकरून दोन्ही धर्माचे पवित्र सण हे प्रेम व सद्भावनेने साजरा करता येतील, असे नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्रात म्हटले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eid Holiday: ईदच्या सुट्टीत राज्य सरकार बदल करणार, आजच GR निघण्याची शक्यता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल