विखे पाटलांचा रुबाब देखणा
जलसंपदामंत्री विखे पाटील यांचा कालचा रुबाब देखणा होता, अशी मजेशीर चर्चा राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतचा त्यांचा वावर तर एखाद्या मुख्यमंत्र्यासारखा होता.. अहो ते काल एक दिवसाचे मुख्यमंत्रीच होते, असं म्हणताच राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये रंगलेल्या या संवादाने मंत्रिमंडळात एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं.
advertisement
छगन भुजबळ नाराज
कॅबिनेट बैठकीला ओबीसी नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ नाराज असल्याचं पहायला मिळालं. कॅबिनेट बैठकीपुर्वी राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक झाली होती. त्या बैठकीत छगन भुजबळ उपस्थित होते. मात्र, कॅबिनेट बैठकीपूर्वी भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली अन् बैठकीवर बहिष्कार घातला होता. कोणत्या जातीचा कोणत्या प्रवर्गात समावेश करायचा हे सरकारचं काम नाही, असं म्हणत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांसाठी नवे संकटमोचक
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याने फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाती चाव्या सोपवल्या. त्यानंतर विखे पाटील मुख्यमंत्र्यांसाठी नवे संकटमोचक म्हणून समोर आले. विखे पाटील यांनी जरांगे यांच्या मागण्या योग्यरित्या सोडवल्याने आता त्यांना भाजपमध्ये नवं स्थान प्राप्त झाल्याची चर्चा आहे.