पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन
पैलवान सिकंदर शेख अटक प्रकरणात आता सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला असून सिंकदर शेख याला न्याय मिळण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. सिकंदर शेख अटकेप्रकरणी दुपारपर्यंत योग्य माहितीसह उत्तर देण्याचं आश्वासन पंजाब मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळेंना दिलं आहे. भगवंत मान आता या प्रकरणावर कोणती कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न
सिकंदर शेख हा एक गुणी पैलवान असून त्याने आतापर्यंत केवळ त्याच्या गुणवत्तेवरच कुस्ती क्षेत्रात स्वतःचं असं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं. कुस्ती सोडून गुन्हेगारी क्षेत्रात तो जाईल, यावर आमचा बिलकूल विश्वास नाही, कदाचित कुस्तीमध्ये त्याची होत असलेली प्रगती पाहून कुणीतरी त्याला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला असू शकतो, अशी शंका रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
सकारात्मक मार्ग निघेल - रोहित पवार
सिकंदर प्रकरणाबाबत महाराष्ट्र सरकारने पंजाब सरकारशी बोलून सिकंदरवर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा चुकीच्या पद्धतीने त्याला अडकवल्यास ते लंबी रेस का घोडा असलेल्या एका मराठी पैलवानावर अन्याय करणारं ठरेल. यासंदर्भात सुप्रियाताईंच्या माध्यमातून पंजाब सरकारशी बोलण्याचा प्रयत्न सुरु असून यातून सकारात्मक मार्ग निघेल, असा विश्वास आहे, असंही रोहित पवार यांनी म्हटलं होतं.
