असा असेल नवा मार्ग
या नव्या नियोजनात बेस्टने काही महत्त्वाच्या मार्गांवर वातानुकूलित (एसी) बस सुरू केल्या आहेत. एकूण आठ बसमार्गांना एसी बसचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना अधिक आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल. त्याचबरोबर, वर्ल्ड ट्रेड सेंटर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हा नवीन ए-207 बस मार्गही सुरू करण्यात आला आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मेट्रो, रेल्वे आणि प्रमुख व्यावसायिक भागांमध्ये सहज पोहोचता येईल.
advertisement
नवीन ए-207 बस मार्ग जी. डी. सोमानी मार्ग, कुलाबा मार्केट, बेरेक नं. 1, नवी नगर, सह्याद्री नगर, एल्फिन्स्टन ब्रीज, दादर, प्रभादेवी, महालक्ष्मी, हाजी अली, पेडर रोड, गिरगाव चौपाटीमार्गे सीएसएमटीपर्यंत धावणार आहे. हा मार्ग खासगी, सरकारी आणि विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे.
एसी बसमध्ये बदललेले काही महत्त्वाचे मार्ग असे आहेत -
ए-207 : मालवणी आगार ते दहिसर बसस्थानक
ए-211 : वांद्रे बसस्थानक ते फादर अँग्नेल आश्रम
ए-215 : वांद्रे रेक्लेमेशन ते टाटा वसाहत
ए-399 : ट्रॉम्बे ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड)
ए-410 : विक्रोळी आगार ते महाकाली गुंफा
ए-604 : नागपाडा स्थानक ते महाकाली मुहा
ए-605 : भांडुप स्टेशन ते टेम्भीपाडा
ए-606 : भांडुप स्टेशन ते अशोक केदारे चौक
'या' भागातील प्रवाशांना होणार फायदा
या बदलांमुळे पूर्व उपनगरात म्हणजेच गोरेगाव, दिंडोशी, ठाणे लिंक रोड, विक्रोळी, घाटकोपर-अंधेरी, भांडुप आणि मुलुंड परिसरातील प्रवाशांना मोठी सोय होणार आहे. बेस्टचे जाळे अधिक मजबूत होणार असून, विद्यार्थी, महिला, कार्यालयीन कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिक यांना मोठा फायदा होईल.
बेस्ट प्रशासनाचा विश्वास आहे की या सुधारित मार्गांमुळे प्रवाशांची संख्या वाढेल आणि प्रवासाचा अनुभव अधिक सुलभ होईल. वाहतूक कोंडी कमी करण्यासही या नव्या बदलांचा उपयोग होईल. ही नवी बससेवा शहरातील मेट्रो आणि रेल्वे प्रवासाला मदत करणारी ठरणार आहे.
