अनेकांना त्या मच्छीचे कोळंबी फ्राय, मसाला कोळंबी, कोळंबी राईस किंवा कोळंबीचे कालवण/ रस्सा यांसारखे पदार्थ फार आवडतात. पण आज आम्ही तुमच्यासाठी स्पेशल अस्सल झणझणीत आगरी पद्धतीचा ‘कोळंबी रस्सा’ कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आलो आहोत. यामुळे चला जाणून घेऊया कसा बनवायचा आगरी पद्धतीचा ‘कोळंबी रस्सा’...
आगरी पद्धतीचा ‘कोळंबी रस्सा’ बनवण्यासाठी कोणकोणत्या साहित्यांची गरज लागते. ‘कोळंबी रस्सा’ बनवण्यासाठी १.पाव कोळंबी, आले लसूण पेस्ट, वांगी नसतील तर शेवग्याची शेंग ही घेऊ शकता, टोमॅटो, हळद, सुक्के वाटण(लसून, भाजलेला खोबरा, कोथिंबीर, वेलची आणि जीरा एकत्र करून केलेले वाटण) मसाला, तेल आणि चवीनुसार मीठ अशा साहित्याची गरज आहे.
advertisement
कृती. - प्रथम कडईत २ टिस्पून तेल गरम करून घेणे, नंतर आले लसूण पेस्ट (पेस्ट कोळंबीला जाडसर ठेवावी )जेणेकरून कोळंबी मधला गोडसर पणा निघून जाईल,मसाला ३ चमचे ,हळद एक चमचा , टॉमेटो, वाटण,सर्व टाकल्यावर एकत्र करून घेणे आणि गॅसच्या बंद आचेवर शिजवून घेणे,वाफ यायला लागली की त्यात कोळंबी वागा टाकून परत झाकण देऊन वाफेवर कोळंबी ५मिनिटे शिजवुन घेणे, थोड्यावेळात कोळंबी त गरम पाणी टाकणे, पुन्हा १०मिनिटे गॅस फास्ट करून शिजवणे, १०मिनटात हॉटेल सारखी मसालेदार कोळंबी रस्सा रेडी...हा रस्सा तुम्ही भात ,भाकरी ,चपाती सोबत खाऊ शकता.