मुंबई : धनंजय मुंडेंचे कृषीमंत्रीपद जाऊन तब्बल पाच महिने उलटले आहेत, तरीही धनंजय मुंडे यांनी सरकारचे 'सातपुडा' हे निवासस्थान रिकामं केलेलं नाही, त्यामुळे पुन्हा ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. मुंबईत आपल्याला कुठेही घर नसल्यामुळं बंगला सोडला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी आधी माध्यमांशी बोलताना दिलं होतं. मात्र .मुंबईत धनंजय मुंडे यांची एक नाही तर तब्बल तीन घरं आहेत, असा गौप्यस्फोट करूणा शर्मा यांनी केली आहे.
advertisement
मुंबईत धनंजय मुंडे यांची एक नाही तर तब्बल तीन घरं आहेत. मलबार हिल, पवई आणि सांताक्रुझ येथे एक फ्लॅट आहे. जर धनंजय मुंडेंना मुंबईत घर नसेल तर सांताक्रूझच्या या घरी येऊन राहा.. मी आणि आपली मुले दुसरीकडे भाड्याने राहू, पण सरकारी मालमत्तेचा गैरवापर सोड अशी ऑफर देखील करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंना दिली आङे.
मुंबईच धनंजय मुंडेंचे चार फ्लॅट : करुणा शर्मा
धनंजय मुंडे खोटं बोलत आहे, मुंबईत त्याचे चार फ्लॅट आहे. धनंजय मुंडेंसाठी 42 लाख रुपयांचा दंड काहीच नाहीये. धनंजय मुंडे पुन्हा कधीही मंत्री होणार नाहीत, त्यांना त्यांचे आमदारपदही गमवावे लागणार आहे, असे देखील करुणा शर्मा म्हणाल्या.
गिरगाव चौपाटीजवळ 22 मजली इमारतीत नवव्या मजल्यावर फ्लॅट असल्याचे मुंडे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे. डिसेंबर 2023 मध्ये मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री यांच्या संयुक्त नावे 16 कोटी 50 लाख रुपयांना ही सदनिका खरेदी केली होती. प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी स्वतः 10 कोटी रुपये खर्च केल्याचा उल्लेख आहे. या घरात सध्या कोणीही राहात नसून खरेदी केल्यापासूनच ते बंद आहे.
काय आहे प्रकरण?
माजी मंत्री धनंजय मुंडे यांन 4 मार्च रोजी तब्येतीचे कारण देत अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर साडे चार महिने उलटले तरी त्यांनी अद्याप बंगला खाली केला नाही . राजीनामा दिल्यानंतर पुढील 15 दिवसांत बंगला रिकामा करणे अपेक्षित होते.मात्र अजूनही ते तिथेच आहेत. तरीही धनंजय मुंडेंचा मुक्काम सातपुडा बंगल्यावरच आहे. त्यामुळे बंगला वेळेत रिकामा न केल्यानं 42 लाखांचा दंड भरावा लागणार आहे.