मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर इथं आज सायंकाळी प्रसिद्ध लॉडविक पॉईंटवर एका व्यक्तीने 550 फूट खोल दरीत उडी मारल्याची घटना समोर आली आहे. संजय वेलजी रुघाणी (वय 52 रा.शांतीनगर , मिरा रोड) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. संजय वेलजी रुघाणी हे बऱ्याच वेळापासून लॉकविक पॉईंटवर फिरत होते. सायंकाळच्या सुमारास त्यांनी लॉकविक पॉईंटवर खाली उडी मारली. सुमारे ५५० फूट खोल दरीत ही व्यक्ती कोसळली. जबर मार लागल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या व्यक्तीचा मृतदेह काढण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांना बोलावण्यात आलं. दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी अथक प्रयत्नातून मृतदेह बाहेर काढला.
महाबळेश्वर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत संबंधित व्यक्ती हा पाचगणी येथील एका हॉटेलमध्ये कामास आहे. याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मृतदेह काढला बाहेर
अधिक माहिती अशी की, आज सायंकाळी ४.३० वाजता महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य सुनील बाबा भाटिया यांचा कॉल आला की, महाबळेश्वर येथील प्रसिद्ध लॉडविक पॉईंटवर एका व्यक्तीने कड्यावरून उडी मारली आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे. यानंतर, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
टीमचे सदस्य ५५० फुट खोल दरीत उतरून मदत कार्यात सहभागी झाले. महाबळेश्वर ट्रेकर्सचे कुमार शिंदे, सोमनाथ वागदरे, अमित कोळी, सौरभ गोळे, जयवंत बिरामणे, अमित झाडे, सौरव सालेकर, सुजित कोळी, आतेश धनावडे, अनिल लांगी, सूर्यकांत शिंदे, सुजित कोळी, मंगेश सालेकर, दीपक ओंबळे, अक्षय नाविलकर, सचिन डोईफोडे आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे आणि आशिष बिरामणे यांचा सामील झाला. या अथक प्रयत्नांनंतर, दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर संबंधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला गेला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
शोधत होते एक मृतदेह सापडले दोन, हरिश्चंद्रगड ठरला मृत्यूचा सापळा, नेमकं काय घडलं?
