TRENDING:

Manoj Jarange Protest: 50 हजार आंदोलक येईपर्यंत तुम्ही काय करत होता? राज्य सरकारला कोर्टाने झाप झापलं; डेडलाईन संपली जरांगे मैदानतच

Last Updated:

तुम्ही आधीच कोर्टात यायलं पाहिजे, मोठी चूक केली, असे म्हणत कोर्टाने राज्य सरकारला देखील चांगली खडसावले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनासंदर्भात आज (२ सप्टेंबर) पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. मुंबईत निर्माण झालेल्या अस्थिर वातावरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत, न्यायालयाने दुपारी तीन पर्यंत आझाद मैदान खाली करण्याचे आदेश दिले होते. मात्र डेडलाईन संपल्यानंतर मनोज जरांगे हे अजूनही मैदानात आहे. त्यानंतर हायकोर्टाने संताप व्यक्त करत 24 तासाची परवानगी असून तुम्ही वेळ संपल्यानंतर कोणत्या अधिकाराने मैदानात बसला असा सवाल केला आहे.तसेच वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निरीक्षण देखील न्यायालयाने या वेळी नोंदवले आहे. तुम्ही आधीच कोर्टात यायलं पाहिजे, मोठी चूक केली, असे म्हणत कोर्टाने राज्य सरकारला देखील चांगली खडसावले आहे.
Manoj Jarange High Court
Manoj Jarange High Court
advertisement

मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारची सुनावणीदरम्यान चांगली खरडपट्टी काढली आहे. 50 हजारांपेक्षा जास्त लोक होती तोवर तुम्ही काय करत होता ? असा सवाल कोर्टाने महाधिवक्तांना सवाल केला आहे. तर आंदोलकांना देखील हायकोर्टाने सुनावले आहे. तुम्हाला सोयी नव्हत्या तर तुम्ही २४ तासात कोर्टात का आला नाही? असा सवाल आंदोलकांना केला आहे. आज कोर्ट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले असून कोर्टाने मराठा आंदोलक आणि राज्य सरकारला खडसावले आहे.

advertisement

बॉम्बे हायकोर्टाचे राज्य सरकारला सवाल?

  • तुम्ही देखील आमच्या आदेशाच उल्लंघन केलं
  • तुम्ही आधीच कोर्टात यायला हवं होतं
  • ही तुमची चुकी आहे
  • कोर्टाने सरकारची खरडपट्टी काढली
  • तुम्ही देखील आमच्या आदेशाच उल्लंघन केलं
  • 50 हजारांपेक्षा जास्त लोक होती तोवर तुम्ही काय करत होता?

बॉम्बे हायकोर्टाचे आंदोलकांना सवाल?

    advertisement

  • तुम्हाला परवानगी नसतानाही तुम्ही मुंबईत आलात?
  • 24 तासाची परवानगी असून तुम्ही का आलात
  • तुम्ही कोणत्या अधिकाराने तिथे बसलात
  • तुमच्याकडू सतत नियमांचं उल्लंघन होत आहे.
  • प्रश्न नाही जर ते करायचं असते तर हा खटला न्यायालयात आला नसता

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Protest: 50 हजार आंदोलक येईपर्यंत तुम्ही काय करत होता? राज्य सरकारला कोर्टाने झाप झापलं; डेडलाईन संपली जरांगे मैदानतच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल