मनोज जरांगेंच्या मनात काय?
प्रत्येक गावातून लोकसभेला 5 ते 7 उमेदवार उभे करायचे
तालुक्यातून 250 हून अधिक उमेदवार उभे राहणार
प्रत्येक जिल्ह्यात एक हजारहून अधिक उमेदवार
ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनीही डिपॉझिट भरायचं
ज्यांच्याकडे डिपॉझिट भरायला पैसे नाहीत, त्यांच्यासाठी गावाने पैसे जमा करायचे
उमेदवार वाढले तर काय होणार?
जिथे आधी एका जागेवर 15 ते 16 उमेदवार दिसायचे तिथे हजार उमेदवार दिसतील
advertisement
निवडणूक आयोगाला तितकीच चिन्हही वाटावी लागतील
तितक्याच पटीत ईव्हीएमची संख्याही वाढवावी लागेल
ईव्हीएम वाढली तर मतदान करताना अधिकचा वेळ लागणार
मतदारांमध्ये चिन्ह आणि उमेदवाराबाबत संभ्रम निर्माण होईल
एका ईव्हीएम बॅलट युनिटवर 16 उमेदवार असू शकतात
त्याहून अधिक उमेदवार झाल्यास 16 च्या पटीनुसार मशीन वाढवावी लागणार
सध्या ईव्हीएमचं तिसरं व्हर्जन त्यात 24 बॅलटिंग युनिट वाढवता येतात
एका केंद्रात 384 उमेदवारांसाठी मतदान होऊ शकतं
त्याहून अधिक उमेदवार वाढवण्याची सोय सध्याच्या सिस्टीममध्ये नाही
काय म्हणाले माजी सहनिवडणूक आयुक्त?
अशा प्रकारे उमेदवारांची संख्या वाढली आणि ती 300 पेक्षा जास्त झाली तर ही निवडणूक मतदान पत्रिकेवर घेणंही निवडणूक आयोगासाठी कठीण होईल, असं मत माजी सह निवडणूक आयुक्त शिरीष मोहोड यांनी व्यक्त केलं.
'32 वा उमेदवार आला तर तिसरं बॅलट होईल. 48 वा उमेदवार आला तर चौथं बॅलट होईल, त्यामुळे आपल्याला बॅलट युनिट्स वाढवावी लागतील. बॅलट युनिट्स वाढवणं अशक्य नाही, पण प्रशासकीयदृष्ट्या अडचणीचं होऊ शकतं,' असं शिरीष मोहोड म्हणाले.
नितेश राणेंची टीका
दरम्यान निवडणुका लढवण्याच्या जरांगेंच्या भूमिकेवर नितेश राणेंनी टीका केली आहे. 'मनोज जरांगेंना मराठा समाजही गांभिर्याने घेत नाही. मराठा समाजामध्येही त्यांचा फार विरोध व्हायला लागला आहे, कारण जरांगे आता मराठा समाजाबद्दल कमी आणि राजकारण जास्त करायला लागले आहेत. जरांगे काय बोलतात याकडे जास्त लक्ष देत नाही', असं जरांगे म्हणाले.
