काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागलं आहे. जातीचा नेता होऊन बसला आणि ओबीसीचा नेता नाही याचा कुणीच, ठराविक लाभार्थी आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांची औकात ओळखली आहे. कुणाच्या बापाची पेंड आहे का, GR रद्द करणं, रद्द करणं सोपी गोष्ट आहे का? आम्ही निवेदन देतो, मागणी केली, मंडल कमिशननं दिलेलं आरक्षण रद्द करा, सगळ्या जाती बाहेर काढा, जशाला तशीच फाइट होणार, तुमच्या भाषेवरच भाषा चालणार आम्ही दया माया कमी केली.
advertisement
आजच्या बैठकीला ओबीसीचे नेते जाणार ते जातीचे नेते आहेत. ओबीसीचे नाही. ओबीसीचा काहीही संबंध नाही. यांच्यापेक्षा आपण ताकदवर आहे, या दोन तीन जाती सोडून बाकीच्यांनी मिळून राहायचं. मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा GR ला अवमान होईल असं त्यांचं ऐकून पाऊल उचलायचं नाही ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. छगन भुजबळ सरकार गिअरमध्ये आणायला उतरले आहेत. त्यांचं ऐकून निर्णय घ्यायचा नाही. मराठ्यांना ते पाऊल उचलायचं नाही. त्याचं ऐकून प्रमाणपत्र वाटप करणं थांबवायचं नाही. दिवाळीच्या आत मराठ्यांना प्रमाणपत्राचं वाटप करा.
विखे साहेब फडणवीस साहेब, संभाजी नगर आणि जालना जिल्हा पूर्वी एक होता इथं 2 लाख कुणबी होते कुठं गायब केले ते ही सांगा, सगळ्याच जिल्ह्यात असे झाले आहे. हैद्राबाद गॅजेट मध्ये जी संख्या आहे आताचे हे मराठे तेच कुणबी आहेत त्यांना प्रमाणपत्र वाटप करा, अन्यथा तुमच्या नरड्यावर येईल. बहाणे सांगू नका, काम सुरू करा असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
तुम्ही मजा बघताय तर तुमच्या नरड्यावर येईल, मग म्हणाल पळा तर पळायला पण जागा उरणार नाही. हैदराबादच्या गॅजेटनुसार प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा. बहाणे सांगू नका असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिल्यानंतर आता काय हालचाली होणार ते पाहावं लागणार आहे.