Numerology: मोबाईल नंबरच ठवरतो तुमचं भविष्य, लग्न जमेना, सतत संकटे येतायेत? आधी हे पाहा...
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Numerology: तुम्ही वापरत असलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवरूनदेखील तुमचे भविष्य ठरू शकते. तुमच्या दैनंदिन जीवन सुखी आणि आनंदी राहण्यासाठी मोबाईल नंबर कसा असावा? याबाबत जाणून घेऊ.
नाशिक: आपल्या आयुष्यात अंकांना मोठे महत्त्व आहे. आपल्या दैनंदिन कामात, आपल्या व्यवसायात, आपल्या व्यवहारात हे अंक खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्याचप्रमाणे हे अंक आपल्यासाठी शुभ किंवा अशुभ सुद्धा ठरत असतात. इतकेच नाही तर तुम्ही वापरत असलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवरूनदेखील तुमचे भविष्य ठरू शकते. तुमच्या दैनंदिन जीवन सुखी आणि आनंदी राहण्यासाठी मोबाईल नंबर कसा असावा? याबाबत नाशिक येथील अंकशास्त्र तज्ज्ञ विभा घावरे यांनी माहिती दिलीये.
अंकशास्त्र हे 1 ते 9 या अंकांवर आधारित असते आणि हेच अंक आपल्या ग्रहांशी जुळलेले असतात. अंकशास्त्रात तुमच्यासाठी दोन अंक हे नेहमी महत्त्वाचे असतात. एक तुमचा मूलांक आणि एक म्हणजे तुमचा भाग्यांक. या दोन नंबरवरून तुमचा लकी नंबर येत असतो. तर याच पद्धतीने आपला मोबाईल नंबरदेखील महत्त्वाचा आहे. हा मोबाईल नंबर योग्य पद्धतीत आपल्याकडे नसला तर याच्यामुळे आपल्याला अनेक अडथळे हे येत असतात. आपण जेव्हा कधी आपला मोबाईल नंबर घेत असतो तेव्हा तुमच्या पूर्ण मोबाईल नंबरची तुम्ही बेरीज करून बघितली तर ती 1, 3, 5, 6 या समान अंकावर आली तर हा अंक सर्वांसाठी लकी ठरत असतो.
advertisement
कोणता अंक आपल्या मोबाईल नंबरमध्ये नसावा?
बरेच लोक चॉइस नंबर घेत असतात. कोणाला सारखे अंक आवडत असतात तर कोणाला वेगळे; परंतु हे अंक आपल्यासाठी शुभ आहे का हे मात्र ठाऊक नसते. याकरता नंबर घेताना 1 आणि 7, 2 आणि 2 किंवा 8 आणि 4, 1 आणि 6 हे अंक तुमच्यासाठी आरोग्याच्या समस्या, कोर्टकचेरी, किंवा जमिनीचे न विक्री होणे, किंवा तुमचे लग्न जमत नाही अशा बऱ्याच समस्या या जीवनात निर्माण होत असतात. त्याचबरोबर 88, 11, 66, 33 असे अंक देखील आपल्या कामात विघ्न आणत असतात. असे अंक असलेले मोबाईल नंबर घेणे टाळा, असे अंक ज्योतिषतज्ज्ञ सांगतात.
advertisement
कोणत्या नंबरमध्ये यश प्राप्ती होणार?
शैक्षणिक प्रगतीसाठी गुरु ग्रहाचा अंक 3 हा चांगला असणार आहे. कौटुंबिक अडचणींसाठी आपल्या नात्यात जोड बनत नाही, सतत भांडण होत असतात तर यासाठी 6 घेऊ शकतात. त्याचबरोबर सर्व क्षेत्रात तुम्हाला पुढे राहायचे आहे तर तुम्ही नक्कीच 5 या अंकाचा आपल्या मोबाईल नंबरमध्ये समावेश करावा. याने नक्कीच तुमच्या दैनंदिन जीवनात प्रभाव दिसेल. असे बरेच अंक हे आपल्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत जे की तुमच्या जन्मतारखेवरून तुम्ही तुमच्या मूलांक आणि भाग्यांकाच्या माध्यमातून मिळवू शकणार आहेत.
advertisement
दरम्यान, अधिक माहितीसाठी तुम्ही नक्कीच नाशिक येथील ग्रेस न्यूमॉरोलॉजिस्ट विभा घावरे यांची मदत घेऊ शकणार आहात. नाशिकमध्ये मुंबई नाक्याजवळील रुंगठा शॉपिक हब या ठिकाणी त्यांचे कार्यलय असून इंस्टा प्रोफाइल gracenumerology या ठिकाणी भेट देऊन देखील अधिक माहिती घेता येईल.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
October 04, 2025 1:44 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: मोबाईल नंबरच ठवरतो तुमचं भविष्य, लग्न जमेना, सतत संकटे येतायेत? आधी हे पाहा...