IND vs WI 1st Test : जड्डूच्या ऑलराऊंडर कामगिरीने टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! तिसऱ्याच दिवशी जिंकली अहमदाबाद टेस्ट

Last Updated:

IND vs WI 1st Ahmadabad Test : वेस्ट इंडिजचा डाव 162 धावांवर आटोपला होता. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने दुसऱ्या दिवसअखेर 448 धावा केल्या अन् डाव जाहीर केला होता.

Team india Win Ahmadabad Test
Team india Win Ahmadabad Test
Team india Win Ahmadabad Test : आशिया कप जिंकल्यानंतर आता टीम इंडियाने चार दिवसातच सुरू झालेला कसोटी सामना देखील जिंकला आहे. टीम इंडियाने पाहुण्या वेस्ट इंडिज संघाचा दारुण पराभव केला. भारताने एक इनिंग राखून विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजचा डाव 162 धावांवर आटोपला होता. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने दुसऱ्या दिवसअखेर 448 धावा केल्या अन् डाव जाहीर केला होता. अशातच आता टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीमुळे मोठा विजय हाती लागलाय. टीम इंडियाने एक इनिंग आणि 140 रन्सने विजय मिळवला आहे. त्यामुळे आता WTC मध्ये टीम इंडियाला मोठा फायदा देखील झालाय.

टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय

वेस्ट इंडिजचा कॅप्टन रोस्टन चेजने टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला, पण भारतीय बॉलर्सच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकला. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्या घातक पेस बॉलिंगच्या जोरावर वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ 162 धावांत संपुष्टात आला.
सिराजने 4 विकेट्स, तर बुमराहने 3 विकेट्स घेत वेस्ट इंडिजच्या बॅटिंगची कंबर मोडली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 2 विकेट्स गमावून 121 धावा केल्या होत्या. केएल राहुलने महत्त्वपूर्ण 53 धावांची नाबाद खेळी करत भारताचा डाव सावरला, तर सलामीवीर यशस्वी जयस्वालने 36 धावांचे योगदान दिलं.
advertisement

टीम इंडियाचे तीन शतकवीर

दुसऱ्या दिवशी भारताच्या बॅटर्सनी पूर्णपणे मॅचवर पकड मिळवली. कर्णधार शुबमन गिलने संयमी 50 धावा केल्या. यानंतर केएल राहुलने आपले शतक पूर्ण केले. परंतु, दिवसाचा खरा हिरो ठरला तो युवा फलंदाज ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा. जुरेलने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकत 125 धावांची दमदार खेळी केली, तर जडेजाने तळाच्या बॅटर्सना सोबत घेत नाबाद 104 धावा केल्या.
advertisement
टीम इंडियाच्या तिन्ही शतकांच्या बळावर भारताने दुसऱ्या दिवसाअखेर 5 विकेट्सच्या मोबदल्यात 448 धावा केल्या आणि वेस्ट इंडिजवर 286 धावांची भक्कम लीड घेतली, ज्यामुळे भारताने ही मॅच डावाने जिंकण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल सुरू केली होती.
advertisement
टीम इंडियाचा स्कॉड - शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, नितीश कुरमा रेड्डी, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा , जसप्रीत बुमराह
वेस्ट इंडिजचा संघ - रोस्टन चेस ( कर्णधार), जोमेल वारिकन, केव्हलॉन अँडरसन, एलिक एथानाझे, जॉन कॅम्पबेल, तेजनारायण चंद्रपॉल, जस्टीन ग्रिव्हस, शे होप, तेव्हिन इमलाच, ब्रेंडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पिएर, जेडन सिल्स, जेडिया ब्लेड्स, जोहान लिन.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI 1st Test : जड्डूच्या ऑलराऊंडर कामगिरीने टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! तिसऱ्याच दिवशी जिंकली अहमदाबाद टेस्ट
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement