Malshej Ghat : थेट दरीच्या कडेवर चालण्याचा थरार! माळशेज घाटावर होणार नवा प्रकल्प

Last Updated:

Malshej Ghat skywalk : माळशेज घाटाचे रूप लवकरच बदलणार आहे. पर्यटकांसाठी आकर्षण ठरणारा काचेचा स्कायवॉक प्रकल्पाला हिरवा कंदिल मिळाला आहे.

News18
News18
माळशेज घाटातील प्रसिद्ध काचेचा स्कायवॉक प्रकल्प अखेर मार्गी लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून आता त्याची काम लवकरच सुरू होणार आहेत. पवार यांनी सांगितले की स्कायवॉकचा सुधारित आराखडा तयार करून त्याला प्रशासकीय मान्यता घेतली जाईल आणि निविदा प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल.
माळशेज घाट हा निसर्गरम्य परिसर आणि धबधब्यांसाठी ओळखला जातो. दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. या स्कायवॉकमुळे घाटाचे सौंदर्य आणखी खुलणार असून पर्यटनात मोठी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खास करून पावसाळ्यात येथील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे स्कायवॉक हा पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण ठरणार आहे.
advertisement
या प्रकल्पासाठी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांनी राज्य सरकारकडे या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. निधीअभावी स्कायवॉकचे काम काही काळ रखडले होते.परंतू, आता अजित पवार यांच्या हस्तक्षेपामुळे प्रकल्प पुन्हा गतीने सुरू होणार आहे.
अजित पवार बुधवारी मुरबाडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून स्कायवॉकचा आराखडा आणि प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी संबंधित विभागांना लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
advertisement
या प्रकल्पामुळे माळशेज घाटाला पर्यटन नकाशावर नवे स्थान मिळेल तसेच स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील. पर्यटन विभागाकडूनही या ठिकाणाचा विकास करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहे. स्कायवॉक तयार झाल्यानंतर माळशेज घाट महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाईल.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Malshej Ghat : थेट दरीच्या कडेवर चालण्याचा थरार! माळशेज घाटावर होणार नवा प्रकल्प
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement